जिल्हाधिकारी बी. एन. पाटील
जिल्हाधिकारी बी. एन. पाटील sakal
कोकण

गुहागर : पर्यटन अनुभवले; समस्यांनाही जाणले

सकाळ वृत्तसेवा

गुहागर: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील परिवारासह गुहागरच्या खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांनी परचुरीतील आजोळ कृषी पर्यटन केंद्र आणि मुंढरमधील मामाचा गांव कृषी पर्यटन केंद्रात राहून ग्रामीण भागातील पर्यटनाचा आनंद लुटला.अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी सुट्टीचा कालावधी निवांतपणे घालवण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेरील ठिकाण निवडतात; मात्र रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील यांनी कार्यक्षेत्रातील ठिकाण निवडले. जिल्हाधिकारी म्हणजे एका अर्थाने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांचा कप्तान. साहजिकच अशा व्यक्तीचा जिल्ह्यातील खासगी दौराही महत्वपूर्ण असतो. थेट प्रशासकीय कामकाज झाले नाही तरी आपल्या जिल्ह्यातील जनता कशी राहते, येथील व्यावसायिकांच्या समस्या काय, प्रशासनाकडून अपेक्षा काय, याची चर्चा, निरीक्षण अशा दौऱ्यांमुळे होते.

जिल्हाधिकारी पाटील यांच्या गुहागरमधील कृषी पर्यटन दौऱ्यात खाडीकिनारी पर्यटनविकासाबाबत अनौपचारिक चर्चा झाली. कांदळवनातील मधुमक्षिका पालनासाठी कांदळवन प्रतिष्ठान, वनविभाग यांच्या सहकार्याने महिला बचतगटांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, परचुरीतील आजोळ पर्यटन केंद्राचे मालक सत्यवान देर्देकर यांनी पाटील परिवाराला मगरसफर, उन्हवरे येथील गरम पाण्याचे झरे, खाडी किनाऱ्यावरील पक्षीनिरीक्षण, खाडीसफर घडवली.

त्या वेळी कांदळवन संरक्षणातील समस्या, रोजगार निर्मितीसाठी कांदळवनात मधुमक्षिका पालन, खेकडे व मासेपालन यावर सकारात्मक चर्चा झाली. दाभोळ खाडीतील पर्यटन वाढवण्यासाठी केरळच्या धर्तीवर हाऊसबोट, फ्लोटिंग रेस्टॉरंट याबाबत चर्चा झाली. यामुळे खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना पर्यटनातून कसा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याची माहिती देर्देकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT