Hapus exports plummet; 50 percent reduction
Hapus exports plummet; 50 percent reduction 
कोकण

हापूसची निर्यात गडगडली़; 50 टक्‍के घट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोट्यवधी रुपये परकीय चलन मिळवून देणाऱ्या हापूसच्या निर्यातीला यंदा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निर्यातीत 50 टक्‍के घट झाली. यंदा एप्रिलमध्ये वाशीतून चार हजार 120 टन आंबा निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात आठ हजार 835 टन निर्यात झाली होती. लांबलेला हंगाम आणि कोरोनामुळे वाहतुकीत निर्माण झालेला अडथळा यामुळे परिणाम झाला आहे. 

ऐन हंगामात कोरोनाने पाय पसरले आणि हापूसवरच संक्रांतच आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव अनुप कुमार आणि कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल निर्यात सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. निर्यातीसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा फायदा निर्यात सुकर होण्यासाठी मदत झाली. यंदा वातावरणातील बदलांमुळे एक महिना उशिराने आंबा तयार झाला. लॉकडाउन सुरू झाल्यावर हापूसच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. एप्रिलच्या मध्यात निर्यात सुरळीत झाली. प्रारंभी समुद्रमार्ग आंब्याचे कंटेनर आखाती देशांना पाठविण्यास सुरवात झाली. त्यानंतर हवाईमार्गे कार्गो विमानातून आंबा निर्यात केली जाऊ लागली. 

यंदा एप्रिलमध्ये चार हजार 120 टन आंबा निर्यात झाला. बहारिन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडला आंबा रवाना झाला. गेल्या वर्षी एप्रिल 2019 मध्ये नऊ हजार 994 टन निर्यात झालेली होती. हवाईमार्गे आंब्याच्या निर्यातीसाठी विमान सेवा अत्यल्प आहेत. यावर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड तसेच युरोपातील देशांमध्ये हवाई वाहतूक सेवा उपलब्ध नाही. कोरोनाची परिस्थिती अद्यापही जागतिक स्तरावर कायम असल्याने दरवर्षीपेक्षा निर्यातीचा टक्‍का अत्यंत कमी असेल, असा अंदाज आहे. 

यंदा तुलनेत निर्यात कमी असली तरी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत आश्‍वासक आहे. आखाती प्रदेशात समुद्रमार्गे निर्यात सुरू राहिल्याने आंब्याला परदेशातील बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यामुळे शेतमालाचा बाजारभाव टिकून राहिला. 
- भास्कर पाटील, उपसरव्यवस्थापक, पणन 

भाजीपाल्याची निर्यात सुखावणारी 
आंब्याव्यतिरिक्त इतर नाशिवंत फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्‍यता होती. मात्र, मुंबई येथून फळे व भाजीपाल्याची अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमधील निर्यात सुखावणारी आहे. मध्य-पूर्व देशांमधून एप्रिलमध्ये फळे व भाजीपाल्यांना चांगली मागणी होती. त्यामुळे निर्यातीवर फारसा परिणाम झाला नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT