heavy rain sawantwadi konkan sindhudurg
heavy rain sawantwadi konkan sindhudurg 
कोकण

सावंतवाडीत मुसळधार पाऊस 

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज सायंकाळी अवकाळी मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. परिसरातील गावामध्ये असलेले काजू व आंबा बागायतदार मात्र चिंतेत आले आहेत. 

चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही तालुक्‍यात अधून-मधून सरींचा शिडकाव होत आहे; मात्र मोठा पाऊस झाला नव्हता. आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा-पाऊण तास पावसाने हजेरी लावली. यामुळे काहीशी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. शहरासह कोलगाव, माजगाव, मळगाव भागातही पाऊस झाला. बांदा परिसरात, कुडाळ तालुक्‍यातील आकेरी, हुमरस, माणगाव खोऱ्यातील काही भाग या परिसरात हलक्‍या सरी कोसळल्या. 

अवकाळीने आंबा व काजू बागायतदार पूर्णतः संकटात आले आहेत. तालुक्‍यात अल्प प्रमाणात आंबा तर मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे एक कलमी काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या काजू व आंबा परिपक्व झाला आहे; मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. फळपिकांना पाऊस लागल्यामुळे हा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. पुढील एक-दोन दिवस पाऊस झाल्यास, ढगाळ वातावरण कायम राहिल्यास ढेकण्या किडी निर्माण होऊन काजू पीक धोक्‍यात येऊ शकते. यावर उपाययोजना म्हणून बागायतदार औषध फवारणीची तयारी करत आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT