Homemade hapus available in red zone of Pune Mumbai 
कोकण

पुणे, मुंबईच्या रेड झोनमध्ये मिळतोय घरपोच हापूस; रत्नागिरीकरांचा जीव आहे धोक्यात 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शेतमालाच्या नावाखाली मुंबई, पुणे येथील रेड झोनमध्ये रत्नागिरीतून आंब्याची घरपोच विक्री केली जात आहे. काही पैसे जादा मिळत असल्याने गाडी चालक आपला आणि पर्यायाने रत्नागिरीकरांचा जीव धोक्यात घालून हापुसची रेड झोन एरियात वाहतूक करीत आहेत. तसेच या गाड्या रत्नागिरीत परतत असताना काही चाकरमानी लपुनछपून गावी परतत असल्याने रत्नागिरीकरांवर कोरोनाचे सावट घोंघावत आहे.


शासनाने आंब्याच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. आंब्याचे मोठे मार्केट पुणे आणि मुंबई भागातच आहे. परंतु सध्या मुंबई आणि पुण्यातच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी असलेल्या रेड झोन एरियापर्यंत आंबा पोच केला जात आहे.

सोसायटीमधून २० पेट्यांची मागणी असल्यास प्रती पेटी २०० रुपये वाहतूक दर आकारून हा माल मुंबई, पुणे मधील कोरोनाच्या रेड झोनमध्ये घरपोच केला जात आहे. हा माल गाडीवरील चालक, क्लीनर प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोच करीत असल्याचे बोलले जात आहे. गावाहून माणूस आल्यावर त्याचे आदरातिथ्य करून चहापाणी केले जात असल्याची माहिती मिळत आहे. हेच चालक आणि मदतनीस पुन्हा रत्नागिरीत येत असल्याचे बोलले जात आहे. येताना काही चालक छुप्या पद्धतीने चाकरमान्यांना गावी आणत आहेत. जाकादेवी येथे अशाच पद्धतीने आलेल्या दोघा चाकरमान्यांना पकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

हे पण वाचा - गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                    

कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात होऊ नये म्हणून कऱ्हाड मार्गे येणारी भाजीपाल्याची वाहतूक देखील प्रशासनाने बंद केली आहे. मग रेड झोन मध्ये जाऊन येणाऱ्या चालक व मदतीनिसापासून कोरोना संक्रमणाचा धोका नाही का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. 

जिल्ह्यातील गुहागरमध्ये अशा चालकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. परंतु, इतर ठिकाणी हा कारवाई का होताना दिसत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रत्नागिरीकरांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे आज रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. मात्र अशा गलथानपणामुळे पुन्हा जिल्हा संकटात येऊन त्याचा त्रास येथील नागरिकांना भोगावा लागू शकतो अशी शक्यता आता निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

Crime: तुम्हाला गिफ्ट द्यायचंय सांगत डोळे अन् हात बांधले, नंतर...; वहिनीचे नणंदेसोबत धक्कादायक कृत्य

Sleeping With Sweater: हिवाळ्यातील मोठी चूक? झोपताना स्वेटर घालणाऱ्यांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

Junnar Leopard : बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची खा. अमोल कोल्हे यांची मागणी!

मेस्सीला पाहायला आलेल्या चाहत्यांनी अचानक का केला मुंबई पोलिसांचा मोठा जयघोष? viral video पाहून तुम्हीही भांबावून जाल

SCROLL FOR NEXT