वडघर - युवा छावणीच्या उद्‌घाटनप्रसंगी हातात हात घेतलेले युवक, गौरी सावंत, प्रिया पाटील आदी.
वडघर - युवा छावणीच्या उद्‌घाटनप्रसंगी हातात हात घेतलेले युवक, गौरी सावंत, प्रिया पाटील आदी. 
कोकण

पुढच्या जन्मीही हिजडा व्हायला आवडेल - गौरी सावंत

सकाळवृत्तसेवा

पाली - 'होय, मला पुढच्या जन्मीही हिजडा व्हायला आवडेल... आपण माणूस म्हणून जन्माला येतो; परंतु आपले असणे, दिसणे व प्रकट होणे हे पुरुषसत्ताक पद्धतीच्या हातात असते. तुम्ही माणूस म्हणून जगत असताना तुमच्या अंतरंगातील माणुसकीचे रंग फिके पडू देऊ नका,'' असे आवाहन तृतीयपंथीय गौरी सावंत यांनी येथे केले.

वडघर (माणगाव) येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या 17 व्या युवा छावणीचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 1) झाले. त्या वेळी गौरी बोलत होत्या. माणसातले माणूसपण जिवंत ठेवणे, त्याचबरोबर सर्वांबरोबर संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

तृतीयपंथीय प्रिया पाटील तसेच गौरी सावंत यांचा जीवन संघर्ष जाणून घेण्याच्या दृष्टीने पत्रकार हीना खान यांनी ही मुलाखत घेतली.

लिंगबदल केलेल्या गौरी यांनी एका मुलीला दत्तकही घेतले आहे. या वेळी त्यांनी आपला "हिजडा ते आई' असा प्रवास कथन केला. "पुढच्या जन्मीही हिजडा होणे आवडेल,' हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

तृतीयपंथीय तसेच लिंगबदल केलेल्या व्यक्तींच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे काम गौरी करीत आहेत. प्रिया पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. लव्हली या तृतीयपंथीयही व्यासपीठावर उपस्थित होत्या.

साने गुरुजी स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्मारकाचा इतिहास तसेच आजच्या अस्वस्थ करणाऱ्या जगातील युवकांपुढील आव्हाने विशद केली. या वेळी साने गुरुजी स्मारकाचे कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर, माजी कार्याध्यक्ष सुरेश कारले आदी उपस्थित होते. ही छावणी 8 मे पर्यंत सुरू राहील.

योगी, बाबा व आम्ही!
प्रिया पाटील या तृतीयपंथी असून, तृतीयपंथीयांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या राज्यभरात काम करीत आहेत. त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीलाही उभ्या होत्या. एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मला निवडणुकीत जिंकायचे नव्हते, तर लोकांची मानसिकता बदलायची होती. योगी, बाबा घर सोडतात; पण हिजड्याने घर सोडले की लोक नावे ठेवतात, अशी व्यथा त्यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT