pali
pali 
कोकण

पाली खोपोली मार्गाची दुरुस्ती न झाल्यास काढणार प्रेतयात्रा

अमित गवळे

पाली - पाली खोपोली महामार्गाची पुर्णपणे दुरवस्था झाली आहे. पंधरा दिवसांत या मार्गाची दुरुस्ती करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक व प्रभावी उपाययोजना न केल्यास मार्ग मृत झाल्याची विडंबनात्मक प्रेतयात्रा काढण्यात येणार असल्याचा इशारा सुधागड तालुका भा.रि.प बहुजन महासंघाने दिला आहे. पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना गुरुवारी (ता.१) या संदर्भाचे निवेदन दिले.

पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 (अ) या मार्गाच्या रुंदिकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. या महामार्गावर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून कुचकामी उपाय योजना करण्यात आली आहे. त्यामूळे एम.एस.आर.डी.सी प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात सुधागड तालुका भा.रि.प बहुजन महासंघ आंदोलन करणार आहे. पाली खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप भा.रि.प बहुजन महासंघाने केला आहे. रुंदीकरणादरम्यान जागोजागी रस्ता खोदल्याने व पर्यायी रस्ता निर्माण न केल्याने प्रवासी व वाहनचालकांचे हाल होत आहेत. तसेच अनेक अपघात देखील होत आहेत. मार्गावर एम.एस.आर.डी.सी प्रशासनामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले सुचनाफलक, दुभाजक, तसेच धारदार पत्र्याचे सुरक्षा कठडे रस्त्यावर तुटून पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, दगडगोटे, माती, धरुळा यामुळे प्रवासी व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी भा.रि.प बहुजन महासंघाचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, सुधागड तालुका सरचिटणीस आनंद जाधव, युवा नेते अनंत साळुंके, विष्णु कदम, राहूल गायकवाड, स्वप्निल गायकवाड, समिर जाधव, श्रीधर साळुंके, चंद्रकांत जगताप, प्रशांत जाधव, प्रशांत गायकवाड, अशोक गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT