IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

विराट कोहलीचा फलंदाजी स्ट्राईक रेटवरून सुरू झालेल्या मुद्याचे संतापात रूपांतर झाले आहे. सुनील गावसकर यांच्यासह इतर समालोचकांनी विराट कोहलीच्या फलंदाजी स्ट्राईक रेटबाबत मत व्यक्त केले. त्याला कोहलीकडून प्रतिउत्तर देण्यात आले.
IPL 2024 Virat Kohli
IPL 2024 Virat Kohli sakal

मुंबई : विराट कोहलीचा फलंदाजी स्ट्राईक रेटवरून सुरू झालेल्या मुद्याचे संतापात रूपांतर झाले आहे. सुनील गावसकर यांच्यासह इतर समालोचकांनी विराट कोहलीच्या फलंदाजी स्ट्राईक रेटबाबत मत व्यक्त केले. त्याला कोहलीकडून प्रतिउत्तर देण्यात आले. कोहलीच्या प्रतिउत्तराला सुनील गावसकरांकडून याप्रसंगी संताप व्यक्त करण्यात आला.

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ५४२ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याचा फलंदाजी स्ट्राईक रेट १४८.०८ इतका राहिला आहे. या मोसमात त्याच्या फलंदाजी स्ट्राईक रेटबाबत सातत्याने चर्चा रंगू लागली आहे. समालोचक कक्षातही मते व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, कोहलीच्या फलंदाजी स्ट्राईक रेटवरून सुरू झालेला वाद पुढे कायम राहिला आहे.

सुनील गावसकर काय म्हणाले?

विराट कोहलीचा फलंदाजी स्ट्राईक रेट ११८चा होता, तेव्हा समालोचकांनी आपले मत व्यक्त केले होते. एखादा फलंदाज ११८च्या फलंदाजी स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो आणि १४व्या किंवा १५व्या षटकांपर्यंत त्याचा फलंदाजी स्ट्राईक रेट कायम राहतो. अशाप्रसंगी त्या फलंदाजाचे कौतुक करावे असे वाटत असेल तर ते योग्य नाही.

IPL 2024 Virat Kohli
Virat Kohli: 'आमचा सामना तर एका बॉलमध्येच संपू शकतो...' विराट असं का म्हणाला? पाहा Video

समालोचकांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

आयपीएल सामने प्रक्षेपित होत असलेल्या क्रीडा वाहिनीकडून विराट कोहलीचे मत सातत्याने दाखवण्यात येत असल्यास तो योग्य नाही. आम्हीही थोडेफार क्रिकेट खेळलो आहोत. आम्ही जे बघतो, त्यावरच आपली मते व्यक्त करतो. क्रीडा वाहिनीकडून कोहलीच्या उत्तराची क्लिप पुन्हा पुन्हा दाखवण्यात आल्यास समालोचकांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल.

कोहलीचे प्रतिउत्तर

काही लोक माझ्या फलंदाजी स्ट्राईक रेटबद्दल बोलतात. फिरकी गोलंदाजांसमोर माझ्या क्षमतेबद्दल बोलतात. बॉक्समध्ये बसून काहीही बोलले जाते. माझ्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. गेली १५ वर्षे मी हेच काम करीत आहे. मैदानात राहून फलंदाजी करणे व समालोचन कक्षात बसून मत व्यक्त करणे यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com