crocodial
crocodial 
कोकण

सावंतवाडीत बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशीवर मगरीचा हल्ला

अर्चना बनगे

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगेली खळणेवाडी येथे घडली. गुराख्याच्या समोरच ही घटना घडल्याने सुदैवाने मगरीचा जीव वाचला; मात्र या हल्ल्यात मगरीचे दात खोलवर रुतल्याने म्हैस गंभीर जखमी झाली.

सांगेली येथील जयानंद पांडुरंग सावंत यांच्या म्हशी घेऊन सिताराम सोनू नाटलेकर हा त्यांच्याच शेतात चरायला गेला होता. तिथून म्हशींना घेऊन घरी परतत असताना शेतातील पाणलोटच्या तळीतील पाणी देण्यासाठी गेला. पाणी पित असतानाच मगरीने हा हल्ला केला. तळीतील मगरीने म्हशीच्या मागच्या डाव्या पायाला लक्ष केल्याने या हल्ल्यात पायावर मगरीचे खोलवर दात लागले. त्यामुळे या पायाला मोठी दुखापत झाली. मगरीने हल्ला करताच म्हशीने हंबरायला सुरवात केली, त्यामुळे जवळच असलेल्या सीताराम नाटलेकर याने तळीकडे धाव घेतली असता म्हशीवर मगरीने हल्ला केल्याचे लक्षात आले. त्याने आरडाओरड केल्यावर मगरीने म्हशीचा पाय सोडला.

दरम्यान, याबाबत वनपाल ढेकळे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या परिसरात मगरींचा वावर आहे. यापुर्वीही असे प्रकार घडले आहेत. मगरींचा बंदोबस्त होत नसल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत आहेत. वनविभागाने याबाबत गंभीर दखल घेत मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. मगरींनी माणसावरही हल्ला केल्याचे प्रकार तालुक्‍यात घडत आहेत. त्यामुळे आजच्या प्रकारानंतर शेतकऱ्यांकडून मगरींबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT