Army Tank
Army Tank sakal
कोकण

Army tank : सैन्यदलाच्या महापराक्रमाचा उलगडणार इतिहास; ‘टी-५५’ रणगाडा कुडाळात दाखल

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ - ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा, लेझीम पथकाची सलामी, एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांचा वेशभूषेत सहभाग, डौलाने फडकणारा भारताचा तिरंगा, विविध प्रकारची स्वातंत्र्य गीते अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात काढलेल्या रॅलीने १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजविलेल्या टी-५५ रणगाड्याचे कुडाळ येथे शनिवारी स्वागत करण्यात आले.

हा रणगाडा एमआयडीसीतील सी.बी.एस.ई. बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये  ठेवण्यात येणार आहे. या रणगाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय सेनेच्या महापराक्रमाचा इतिहास उलगडण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हा रणगाडा कुडाळात दाखल झाला आहे.

येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय सेनेने गाजविलेल्या महापराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना भारतीय सैन्याच्या शस्त्र सामग्रीचे ज्ञान मिळावे, यासाठी भारतीय थल सेनेकडे टी-५५ या रणगाड्याची मागणी केली होती. भारतीय थलसेनेकडून (आर्मी) बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला.

हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजविलेल्या रणगाड्यांपैकी एक आहे. शुक्रवारी (ता. १९) आर्मी विभागाच्या खडकी- पुणे येथून तो ताब्यात घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT