कोकण

बाबासाहेबांकडून आंबडवेकरांची आत्मियतेने विचारपूस

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : विद्या संपादन करण्यात व जनतेला गुलामगिरीच्या गर्तेतून मुक्त करण्यात बाबासाहेब गढून गेले होते. त्यामुळे पुन्हा वतनी आंबडवे गावी येण्याचा योग आला नाही. त्यांचे वारस भाऊ व नातेवाईक आंबडवेतून राजगृहावर भेटीला येत, त्यावेळी लोककल्याणकारी अशा मोठ्या कार्यात व्यस्त असतानाही बाबासाहेब मोजक्या शब्दांत आत्मियतेने विचारपूस करीत प्रश्न विचारीत. यावरून त्यांचे मूळ गावाविषयी असणारे प्रेम व आपुलकी व्यक्त होत असे, अशा आठवणी बाबासाहेब आंबेडकरांच्या आप्तांनी आज होणाऱ्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त जागवल्या.

जगाला चकित करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे आहे. याच चिमुकल्या खेड्याने भारताला घटनाकार दिला. त्या आपल्या मूळगावाला बाबासाहेब कधीही विसरले नाहीत. अनेक वेळा त्यांनी दापोली व मंडणगडला पुन्हा पाहण्याचे विचार व्यक्त केले होते. आंबडवे गावातील आठवणी ते विसरले न्हवते. त्यांचे वारस भाऊ अर्जुन, गणू, सीताराम, रामा ही सकपाळ मंडळी गावावरून फणस, आंबे यांची भेट घेऊन राजगृहावर जात असत.

एक-दोन दिवस रहात असत. केव्हा तरी त्यांची बाबासाहेबांशी भेट होत असे. अशाच एका भेटीदरम्यान बाबासाहेबांनी विचारले, अरे गणेश डोहावरील जमीन कोण कसत? त्यामध्ये आंब्याची व हार्डीची झाडे होती, त्याचे उत्पन्न कोण घेते? चौदा पंधरा वर्षाचा असताना ते वडिलांसोबत आंबडवे येथे आल्याचे सांगत, तेव्हा परिसरातील रहाटीतील देवालयामध्ये वानरांना हाकलून तेथेच पुस्तक वाचता वाचता झोपल्याची आठवण त्यांनी सांगितल्याचे नातेवाईक आजही सांगतात. तसेच मोठे बंधू आनंदराव यांच्या लग्नासाठी आंबडवेत आले असताना लग्न विसरून जाखमाता देवळात पुस्तक वाचत मग्न झाल्यानंतर त्यांची शोधाशोध झाल्याचा किस्सा चांगलाच त्यावेळी रंगला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव आंबडवे या दऱ्या खोऱ्यातील लाल मातीच्या पुण्य भूमीमध्ये त्यांच्या पूर्वजांनी जन्म घेतला. ज्या घरामध्ये वास्तव्य केले, ज्या गावामध्ये वतनाची जमीन आहे, रक्ताचे वंशज आहेत. अशा इतिहासाचा दाखला देणाऱ्या या पवित्र स्थानाचे नाते तुटेल काय?

- सदानंद जी. धोत्रे, तत्कालीन सरचिटणीस, स्मारक मंदिर मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT