sakal
sakal
कोकण

इस्लामपूर : रस्त्याकडेला झोपलेल्या मुलाला JCB ने चिरडले

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर: येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याकडेला झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट (वय १३, रा. अभियंतानगर, इस्लामपूर) या शाळकरी मुलाचा आज पहाटे जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाला. वाघवाडी फाटा ते इस्लामपूर रस्त्यावर अपघात झाला. जेसीबी चालक जयमंगल बैजनाथ सिंह (२८, रा. मूळ गाव हिंमतपूर, जि. गोपालगंज-बिहार, सध्या रा. वाघवाडी फाटा) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी वाघवाडी ते इस्लामपूर या रस्त्यावर अभियंतानगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडविण्याचे काम करतात. या दगडकाम करणाऱ्या पाथरवट कुटुंबातील जीत वाहन बाढाईत (५०) परशुराम विश्वनाथ (१२) व हर्षवर्धन पाथरवट हे तिघे रस्त्याकडेला झोपले होते. झोपलेल्या स्थितीत आज सकाळी हर्षवर्धन मृतावस्थेत आढळला.

काँक्रीट रस्त्याचे काम व साईडपट्टीच्या सपाटीकरणाचे काम जेसीबी (एमएच ५० सी १६३५)च्या सहाय्याने चालक जयमंगल सिंह करीत होता. पहाटेच्या सुमारास बेदरकारपणे जेसीबी चालवून त्याने हर्षवर्धनला चिरडले. अपघातानंतर तो निघून गेला. बाजूला झोपलेले दोघेही सुरक्षित असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत होते. घातपाताचा प्रकार आहे का, यादृष्टीनेही तपास करण्यात आला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा गतिमान केली. तपासात हा अपघात असल्याचे निष्पन्न झाले. जेसीबीने डोक्यावर इजा झाल्याने हर्षवर्धन मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी येऊन तपास केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही घटनास्थळी आले होते. मृत हर्षवर्धनच्या उजव्या दंडावर जेसीबीमुळे जखमा झाल्याचे दिसून आले. जेसीबी चालक जयमंगल सिंह याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्याने अपघाताची कबुली दिली.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक दिलीप ढेरे, सहायक फौजदार मारुती साळुंखे, गजानन घस्ते, सुनील चौधरी, सचिन धोत्रे, कुबेर खोत, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, बजरंग शिरतोडे यांनी तपासात सहभाग घेतला. सहायक निरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT