कोकण

कलाभवन शाहीर परिषद कोकण विभागाचेच

सकाळवृत्तसेवा

मंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्याय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे हिताचे कार्य करीत राहिलो. त्यामुळेच न्यायदेवतेने आमच्या ट्रस्टचे बाजूने निर्णय दिला असून कलाभवन मंडणगड हे मराठी शाहीर परिषद कोकण विभाग याच संस्थेच्या ताब्यात राहणार आहे. हाच अधिकृत ट्रस्ट असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक शाहीर हरिश्‍चंद्र लोखंडे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषदेत दिली. 

मराठी शाहीर परिषद कोकण विभाग ट्रस्टच्या वतीने शाहीर लोखंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. ट्रस्टचे संचालक विश्वदास लोखंडे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्णयाचे वाचन केले. लोखंडे म्हणाले, काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबईचे प्रमुख पदाधिकारी असल्याचे भासवून काही तोतया

पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे, तहसील कार्यालय या ठिकाणी तक्रारी दाखल करून कलाभवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय कार्यालय यांच्याकडेही दावा दाखल केला. मात्र, हे तोतया पदाधिकारी असल्याने यांचा दावा फेटाळण्यात आला. मंत्रालयात अर्ज करून मंत्र्यांना चुकीची माहिती देऊन राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, यंत्रणेने शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे मराठी शाहीर परिषद कोकण विभाग हा आमचा ट्रस्ट रद्द करून स्थावर मालमत्ता त्यांच्या ताब्यात मिळावी, याविषयी अपील दाखल केले. मात्र न्यायालयाने आमचा ट्रस्ट हा अधिकृत असल्याचा निर्णय दिला.

पत्रकार परिषदेला संस्थेचे प्रमुख पदाधिकारी शाहीर तुकाराम माळी, तुकाराम रेणोसे, पांडुरंग बाईत, प्रभाकर जाधव, सदस्य अनंत केंद्रे, संतोष पार्टे, जगदीश जाधव, सखाराम माळी, अरुण नाकती, अशोक वनगुळे, दत्ताराम उत्तेकर, पांडुरंग पोस्टुरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT