कोकण

आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडाच्या दोन्ही बाजूने जाणार महामार्ग 

सकाळवृत्तसेवा

संगमेश्वर - गतवर्षी आरवली येथे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर गरम पाण्याची कुंडे बुजवली जाणार, अशी चर्चा होती. कुंडाजवळ काम सुरू झाल्यानंतर मात्र रस्ता कुंडाच्या जवळून काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही बाजूच्या पुलांमध्ये ही कुंडे सुरक्षित राहणार आहेत. आजच या कुंडांचा 108 वा वर्धापन दिनही साजरा केला. 

ब्रिटिशांच्या काळात मुंबई-गोवा मार्गाचे काम हाती घेण्यात आले.आजच्यासारखी यंत्रणा त्या काळात नसल्याने आव्हानात्मकच होते. डोंगर खोदणे आणि पूल उभारणे ही कामे प्रथम हाती घ्यावी लागली. आरवलीजवळ काळ्या पाषाणात पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी गडनदी पात्रालगत खोदकाम सुरू असताना 24 जानेवारी 1911 ला गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. गंधकमिश्रीत या पाण्याचा उपयोग मार्गावरील प्रवाशांना, आरवली परिसरातील ग्रामस्थांना व्हावा, या हेतूने या गरम पाण्याच्या साठ्याची स्त्री आणि पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कुंडे बांधली गेली. या घटनेला आज 108 वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी सकाळी या कुंडाचे पूजन केले. महामार्गावर ही कुंडे असल्याने पर्यटक, प्रवासी आणि ग्रामस्थांची येथे प्रचंड गर्दी असते. 

कुंडाच्या परिसराचे सुशोभिकरण होणे गरजेचे असून स्त्री आणि पुरुष पर्यटकांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अपेक्षित आहे. कुंडाची स्वच्छता राखण्यासाठी काही नियमावली अथवा नाममात्र शुल्क आकारून देखभाल केली गेली तर सर्वच पर्यटक गरम पाण्याच्या कुंडात आनंदाने स्नान करू शकतील.'' 

- हर्षल पाटणकर, आरवली 
 
भराव करणे योग्य नाही - रहाटे 
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करत असताना आरवली येथील गरम पाण्याची कुंडे रस्ता मार्गात येत होती. मात्र या ठिकाणी भराव करणे हे शास्त्रीयदृष्ट्‌या योग्य नसल्याने रस्त्याची आखणी करताना गरम पाण्याच्या कुंडाचा भाग सोडून देण्यात आल्याचे रस्ता कामाचे संगमेश्वर येथील स्थानिक ठेकेदार संदीप रहाटे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT