khed corona patient case story in ratnagiri
khed corona patient case story in ratnagiri 
कोकण

त्याला आजीची शेवटची इच्छा करायची होती पूर्ण म्हणून तो गावी आला अन् काळाने घातला त्याच्यावरच घाला.....

सिद्धेश परशेटये

खेड (रत्नागिरी) : वृद्धापकाळाने मृत्यु पावलेल्या आजीच्या उत्तर कार्याला उपस्थित राहिलेल्या नातवाचा मृत्युपश्चात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खेड तालुक्यातील ज्या भागात उत्तर कार्य झाले. तो परिसर सिल करण्यात आला आहे. तर उत्तर कार्याला उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांनाही क्वारंन्टाईन करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील शिवनेरी नगर येथील एक ९० वर्षीय वृद्धा पनवेल येथे आपल्या कुटुंबीयांसह रहात होती. काही दिवसांपुर्वी तीचा पनवेल येथेच वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या वृद्ध महिलेचे उत्तर कार्य तिच्या मुळ घरी व्हावेत अशी तिची शेवटची इच्छा होती.

त्यामुळे खेड शिवनेरी नगर येथील घरीच उत्तर कार्य उरकण्यात आले. या कार्याला तिचा पनवेल येथे राहणारा नातू उपस्थित होता. मात्र त्यावेळी त्याला ताप येत होता. परंतु यासार्या गडबडीत त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. उत्तर कार्य  उरकल्यानंतर तो पुन्हा पनवेल येथे गेला. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पनवेल येथील रुग्णालायत दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना ३ जुन रोजी त्याचा मृत्यु झाला. मृत्युपश्चात आलेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल प्रशासनाने याबाबत खेड प्रशासनाला माहिती दिली.

घटना गंभीर असल्याने खेड प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत वृद्धेचे उत्तर कार्य ज्या शिवनेरी नगर परिसरात झाले तो परिसर सिल करत त्याची पत्नी, लहान मुलं आणि अन्य नऊ जणांना होम क्वारंनटाईन केले आहे. खेडच्या  तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, खेड येथील शिवनेरी नगर येथे उत्तर कार्याला उपस्थित राहिलेल्या व्यक्तिचा मृत्युपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे पनवेल प्रशासनाने कळविल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल येथे मयत झालेल्या त्या व्यक्तिच्या पत्नी आणि मुलांसह आणखी काही जणांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.

क्वारंनटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे स्वँब घेण्यात येणार असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर या पैकी कोणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. खेड शहरालगत असलेल्या शिवनेरी नगर परिसर सिल करण्यात आला असल्याने आजुबाजुच्या नागरिकांमध्ये भतीचे वातावरण  निर्माण झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT