cow (lampi viral)
cow (lampi viral) esakal
कोकण

Kokan : चिपळुणमध्ये ६ हजार जनावरांचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला नसला तरी तो होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर येथील शेतकऱ्यांचे गोधन वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या आदेशानुसार जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

चिपळूण तालुक्यात ३५ हजार जनावरांची नोंद आहे. लम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याला १० हजार लस पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या रामपूर, सावर्डे, कापरे, कळकवणे, कुंभार्ली, वहाळ, तुरंबव, नांदगाव या आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ४ हजार ६०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ३ हजार ५१२ जनावरांना लस देण्यात आली. त्यातील ११२ लस वाया गेल्या असून सध्या ९७६ लस शिल्लक आहेत. राज्यशासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ५ हजार ४०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार ४१५ जनावरांना लस देण्यात आली तर ७९ लस वाया गेल्याने सध्या २ हजार ९०६ लस शिल्लक आहेत.

पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे लसीकरण कामात मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र त्यावर वेळीच मार्ग काढून कंत्राटी पद्धतीवर १७ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या डोक्यावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

चिपळूण तालुक्यात ३५ हजार गाय, बैल, म्हैस व रेडा या पाळीव जनावरांची अधिकृत नोंद आहे. राज्य शासनाकडून या जनावरांना टप्प्याटप्प्याने लस पुरवली जाणार आहे. उपलब्ध लसीनुसार या जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे.

- व्ही. एस. बारापात्रे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT