Konkan Railway 
कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वे सेवा रात्रीपासून ठप्प; 7 गाड्या रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

Konkan Railway services suspended: माहितीनुसार, दरड काढण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे. रात्रीपासून रेल्वे गाड्या थांबल्या असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली असून गेल्या जवळपास १४ तासांपासून कोकण रेल्वे सेवा ठप्प आहे. यामुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. माहितीनुसार, दरड काढण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे. रात्रीपासून रेल्वे गाड्या थांबल्या असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली. संपूर्ण रेल्वे ट्रॅकवर चिखल साचला आहे. ट्रकवरील माती काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. पण, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वे रात्रीपासून थांबून आहेत. पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे माती दूर करण्यास अडथळा निर्माण होत आहे. जोपर्यंत दरड हटवली जात नाही तोपर्यंत रेल्वे गाड्या तेथेच थांबून असणार आहेत.

खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या आहेत. सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर पाच गाड्या वेगळ्या मार्गाने हलवण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाला यश आलं नाही. रात्रीपासून हे काम सुरु आहे. पण, अजून रेल्वे मार्ग क्लिअर करता आलेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेसेवा ठप्प असणार आहे. वेगवेगळ्या स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

कोणकोणत्या रेल्वे झाल्या रद्द

-पुणे- एर्नाकुलम नेत्रापती एक्स्प्रेस

-गांधीधाम एक्स्प्रेस

-निझामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस

-दिवा रत्नागिरी

-सावंतवाडी रोड-दादर-तुतारी एक्स्प्रेस

-मंगळुरु जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस रद्द

रखडलेल्या गाड्या

-मडगाव जं. मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस

-सावंतवाडी रोड दिवा एक्स्प्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT