सिंधुदुर्गनगरी - राज्य शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सिंधुदुर्गात अद्यापही विद्यार्थ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभलेला नाही. जिल्ह्यातील 247 शाळांमधील 42,424 विद्यार्थ्यांपैकी केवळ 10,033 विद्यार्थीच उपस्थित राहात असल्याच्या अहवालावरून अद्यापही तब्बल 32,391 विद्यार्थी शाळांपासून दूर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही विद्यार्थ्यांचा 100 टक्के प्रतिसाद दिसून येत नाही. जिल्ह्यात 247 माध्यमिक विद्यालय असून त्यामध्ये 42 हजार 424 विद्यार्थी आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही शंभर टक्के शाळा सुरू झालेल्या नाहीत. 247 शाळांपैकी 188 एवढ्याच शाळा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे; मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता 42 हजार 424 विद्यार्थ्यांपैकी केवळ 10 हजार 033 विद्यार्थीच उपस्थित राहत आहेत. उर्वरित 32 हजार 391 विद्यार्थी अद्यापही शाळेच्या प्रवाहापासून दूर आहेत, असे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय शाळांमधील उपस्थिती
तालुका शाळा एकुण विद्यार्थी उपस्थिती
दोडामार्ग 17 1556 509
वैभववाडी 20 2102 935
कुडाळ 34 8476 1505
देवगड 37 6065 1217
वेंगुर्ले 19 3464 744
मालवण 35 4376 815
सावंतवाडी 50 8415 3063
कणकवली 35 7970 1245
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.