Mahendra Natekar passed away independent Konkan movement kankavli
Mahendra Natekar passed away independent Konkan movement kankavli sakal
कोकण

स्वतंत्र कोकणचे चळवळीचे प्रणेते प्रा.महेंद्र नाटेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : स्वतंत्र कोकण चळवळ, सोनवडे घाटमार्ग, पेन्शनर्स, वृक्षमित्र आदी संघटनांचे संस्थापक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील धडाडीचे नेते प्रा.महेंद्र नाटेकर (वय ८२) यांचे आज निधन झाले. गोवा बांबुळी येथील रूग्‍णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (ता.१७) कणकवलीत त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्कार होणार आहेत. वडाचा पाट मालवण येथे गरीब कुटुंबात प्रा.नाटेकर यांचा जन्म झाला. मात्र खडतर परिस्थितीत त्‍यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मालवण येथील प्रागतिक विद्यालय येथे अध्यापक तर कणकवली महाविद्यालयात प्राचार्यपदाची धुराही त्‍यांनी सांभाळली. त्‍यानंतर खेड्यात जाऊन शिक्षणाचे कार्य सुरू ठेवण्यासाठी सुरवातीला कळसुली हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक त्‍यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत कॉलेजमध्ये प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली.

जांभवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणार अबाळ आणि ग्रामस्थांचे हाल पाहून त्‍यांनी सोनवडे-घाटमार्गासाठी लढा सुरू केला आणि तत्‍कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या काळात हा घाटमार्गही मंजूर करून आणला. अध्यापनाचे काम करत असताना त्‍यांनी जिल्‍हा परिषदेची निवडून जिंकून राजकीय क्षेत्रातही काम केले होते. तर प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्‍यानंतर वृक्षमित्र संघटनेच्या माध्यमातून फळबाग आणि बांबू लागवडीसाठी त्‍यांनी चळवळ सुरू केली. अापल्‍या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्‍यांनी पाच लाख रोपांचे जतन आणि वृक्ष संवर्धनही जिल्ह्यात यशस्वी करून दाखवले होते.

कोकणची सर्वागिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण चळवळीचा लढा अखेर पर्यंत त्‍यांनी तेवत ठेवला. सोनवडे घाटमार्गासाठी तर त्‍यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली. पेन्शनरांच्या समस्या सोडविण्यासाठीही ते अखेरपर्यंत झटत राहिले. त्‍यांनी शिक्षण क्षेत्रावर अनेक पुस्तके लिहिली. कोकण विकास महामंडळावर संचालक म्‍हणूनही त्‍यंानी काम केले. याखेरीज जिल्‍हा दक्षता समिती, निराधार व स्वयंरोजगार समितीवरही ते सदस्य होते. सिंधुदुर्ग जिल्‍हा साक्षर होण्यातही त्‍यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्‍यांच्या पश्‍चात जावई डॉ.संदीप, सून डॉ.प्रतिमा, मुलगी डॉ.सई लळीत, जावई सतीश लळीत तसेच नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT