court
court 
कोकण

बलात्कारप्रकरणीच्या खटल्यावरील तेजपालचा अर्ज फेटाळला 

विलास महाडिक

पणजी : सहकारी महिला कर्मचाऱ्यावरील कथित बलात्कारप्रकरणीच्या खटल्यावरील सुनावणी रद्द करण्यासाठी संशयित तरुण तेजपाल याने केलेला अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे त्याला आता म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावरील सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. 
गोव्यातील एका महोत्सवावेळी संशयित तरुण तेजपाल याने स्वतःचीच सहकारी महिला कर्मचाऱ्याचा हॉटेलमधील लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला होता व त्यावर न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र रद्द करण्यासाठी व खटल्यावरील सुनावणी रद्द करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या उच्च न्यायालयाने आरोपपत्र रद्द करण्यासाठीची विनंती फेटाळून लावली तसेच खटल्यावरील सुनावणी घेण्यास अतिरिक्त सत्र न्यायालयाला परवानगी दिली मात्र त्यावरील निर्णय उच्च न्यायालयातील संशयिताच्या अर्जावर निवाडा होत नाही तोपर्यंत न देण्याचे निर्देश दिले होते. खंडपीठाने आज त्याचा हा अर्ज फेटाळल्याने सदर निर्देशही रद्दबातल ठरला आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT