कोकण

आकारीपड प्रश्‍नाबाबत दोन दिवसात मसुदा - केसरकर

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ - माणगाव खोऱ्यातील आकारीपड प्रश्‍नाबाबत येत्या दोन दिवसात प्रांताधिकारी व शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मसुदा तयार होईल. तो मसुदा शेतकऱ्यांना मान्य झाल्यास महसुल विभागाकडे पाठवण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले.

माणगाव खोऱ्यातील आकारी पडचा प्रश्‍न गेले कित्येक वर्षे जैसे थे स्वरूपात आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून त्यातील प्रकल्पग्रस्तांनी सातत्याने लढा दिला. या आकारीपडबाबतचा निर्णय होण्यासाठी वेळोवेळी बैठका तसेच मंत्री याची भेट व निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. अलीकडेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव खोऱ्यातील प्रगतशील बागायतदार दादा बेळणेकर, बाळ सावंत, किशोर शिरोडकर, योगेश बेळणेकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले.

या आकारीपड प्रश्नाबाबत नुकतीच बैठक मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती. या बैठकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी आकारीपड प्रश्‍नाबाबतची पूर्णपणे माहिती घेऊन हा प्रश्‍न जिल्हाधिकारीही पातळीवर सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला दिले होते.

त्यानुसार याबाबतची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात पालकमंत्री केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, अतुल रावराणे, दादा बेळणेकर, योगेश बेळणेकर, बाळ सावंत तसेच माणगाव खोऱ्यातील शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती. या बैठकीत आकारीपड प्रश्‍नाबाबतची सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.

त्या बैठकीनुसार आकारीपड प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसात त्यांच्या दालनात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत आकारीपडबाबत जो मसुदा तयार होईल तो मसुदा शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन मान्य झाला तर तो महसूल विभागाकडे पाठवण्यात येईल व त्यातून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल, असे श्री. बेळणेकर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT