pali
pali 
कोकण

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ढिसाळ व्यवस्थापन

अमित गवळे

पाली - शिक्षणापासून वंचित राहिलेले तसेच काम करणारे विदयार्थी आपले अपुर्ण शिक्षण पुर्ण करता यावे व आपल्या सोईनुसार शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश मिळवितात. मात्र जिल्ह्यातील या विद्यापिठातील विदयार्थ्यांना नियोजीत परिक्षा केंद्र न मिळता दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाल्याने मोठी गैरसोय झाली आहे.

पाली येथील ग.बा. वडेर हायस्कुलमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे. मागील काही वर्षांपासून या केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा येथेच होतात. मात्र या वर्षी या केंद्रातील परिक्षा अचानक रद्द झाल्या आणि येथील विदयार्थांना पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय हे परिक्षा केंद्र मिळाले. त्यामुळे या केंद्रातील साधारणतः चारशे-पाचशे विदयार्थ्यांना पेण येथे परिक्षेसाठी जावे लागत आहे. या केंद्राबरोबरच इतर केंद्रावरील काही विदयार्थ्यांना देखिल त्यांच्या जवळचे परिक्षा केंद्र मिळाले नाही. दुरवरच्या परिक्षा केंद्रावर जाण्या-येण्यातच त्यांचा खुप वेळ जातो. तसेच प्रवासाचा देखिल त्रास होत आहे. काही वेळेस वाहतुक कोंडीचा सामना देखिल करावा लागतो. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक नोकरी धंदा करणारे विदयार्थी व महिला देखिल आहेत. परिणामी या विदयार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेक विदयार्थ्यांनी सकाळला सांगितले की परिक्षा केंद्र बदलणार होते. याची कोणतीच कल्पना आम्हाला मिळाली नाही. नियोजीत किंवा पुर्वीचे परिक्षा केंद्र मिळणार नसते तर आम्ही या केंद्रावर प्रवेश घेतला नसता.

परिक्षा केंद्र निवडीचा विदयार्थ्यांना पर्याय नाही जिल्ह्यात पाली, निजामपुर, तळा,  इंदारपुर, कोलाड व पेण आदी ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्र आहेत. त्यातील कोलाड केंद्र दोन वर्षांपुर्वी बंद झाले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार जवळच्या केंद्रावर प्रवेश घेतला. त्यांना असे वाटले की या केंद्रावरच आपल्याला प्रवेश मिळेल. मात्र तसे न होता त्यांना दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाले आहे. श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणच्या विदयार्थ्यांना तर पेण येथील म्हणजे जवळपास दिडशे किमीहुन अधिक अंतरावरील परिक्षा केंद्र मिळाले आहे. या सर्व विदयार्थ्यांनी विद्यापिठाच्या या कारभाराबद्दल राग व्यक्त केला आहे.

यासंदर्भात पाली केंद्राशी संपर्क साधला असता तेथून सांगण्यात आले की, आम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यास सांगितले आहे. हे केंद्र परिक्षा केंद्र म्हणून सुरु अथवा बंद ठेवा या संदर्भात विद्यापिठाकडून कुठलाही पत्र व्यवहार केला गेलेला नाही.

विदयार्थ्यांची कसून तपासणी
पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय या परिक्षा केंद्रावर आलेल्या विदयार्थ्यांची रोज कसुन तपासणी होते. महिला व पुरुषांची कॉपी तपासणीची दोन वेगवेगळी पथके आहेत. प्रत्येक वर्गावर हे पथक दोन तीन वेळा तपासणी करते. त्यामुळे काहीही न केलेले विदयार्थी मानसिक दडपणाखाली पेपर देतात असे अनेक विदयार्थ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT