कोकण

नाणार संघर्ष समितीच्या आंदोलनात यापुढे सेनेचा सहभाग नाही - आमदार साळवी

सकाळवृत्तसेवा

राजापूर - “ छोटे व्यक्तीमत्व असलेल्या अशोक वालम यांनी शिवसेना पक्षासह त्या पक्षांच्या नेत्यांवर टिका-टिप्पणी करणे योग्य नाही. कोणताही राजकीय वारसा नसलेले वालम शिवसेनेला वारंवार टार्गेट करत स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दामध्ये आमदार राजन साळवी यांनी वालम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने यापूर्वी छेडलेल्या धरणे आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी झाली होती. मात्र वारंवार टार्गेट केले जात असेल तर भविष्यामध्ये समितीच्या वतीने छेडलेल्या धरणे आंदोलनांमध्ये सेना सहभागी होणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. 

कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष वालम यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते. त्याला आमदार श्री. साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेवून जोरदार प्रत्युत्तर दिले.

रिफायनरी प्रकल्प उभारणीला शिवसेनेचा विरोध असून भविष्यामध्येही कायम राहणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन रद्द करण्याच्या घोषणा करणारे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादन रद्द करण्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्राकडे पाठविला आहे. त्यामुळे प्रकल्प रद्दची पुढील प्रक्रिया करण्याची जबाबदारी असलेल्यांच्या विरोधात रान उठविण्याऐवजी वालम यांच्याकडून सेनेला टार्गेट करणे योग्य नाही, असे साळवी यांनी सांगितले.

भविष्यामध्ये कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने छेडलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याऐवजी सभागृहामध्ये आणि रस्त्यावर स्वतंत्र आंदोलन छेडू असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणूकीमध्ये भाजपसोबत युती करण्याचा आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय घेण्यापूर्वी रिफायनरी रद्द करण्याची अट शिवसेनेने ठेवावी अशी मागणी वालम यांनी केली आहे. त्याबाबत साळवी म्हणाले की, निवडणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार मातोश्रीसह शिवसेनेच्या वरिष्ठांचा आहे. त्याबाबत वालम यांनी सल्ला देण्याची गरज नाही. अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे काळाची गरज असून त्याबाबतची आग्रही भूमिका शिवसेनेची पूर्वीपासून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT