narayan rane
narayan rane 
कोकण

नारायण राणेंनी मंत्रीपदाची स्वप्ने बघणे सोडावे: शिवसेना

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - 'नारायण राणेंनी मंत्रीपदाची स्वप्ने बघणे सोडावे. शिवसेनेचे सर्व आमदार पक्षाशी आणी पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे ते राणेंना मदत करतील हे राणेंचे स्वप्नच राहील,'  अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज (बुधवार) येथे केली

दुधवडकर हे आज जिल्हा दौ-यावर होते. ते म्हणाले "गेली 23 वर्षे भाजपावर आम्ही विश्वास ठेवला. त्यांच्या बरोबर संसार केला होता त्याचे काय झाले हे सर्वाना माहीत आहे. मात्र त्याच पक्षाच्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर राणेंनी विश्वासच ठेवला आहे. तेच आता त्यांना आदरणीय झाले आहेत. त्याचे काय होईल हे लवकरच दिसेल. राणेंच्या विरोधात आता आम्हाला काय बोलायची गरज वाटत नाही'.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात संघटना वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी  संघटना मजबूत करण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. 10 डिसेंबर नंतर गाववार दौरे सुरू करण्यात येणार आहे, यावेळी  राजू नाईक, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, रश्मी माळोदे, रेश्मा नाईक, शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT