देवरूख - विलास रहाटे याने चितारलेली रांगोळी.
देवरूख - विलास रहाटे याने चितारलेली रांगोळी. 
कोकण

नेशन फर्स्ट- व्होट मस्ट, रांगोळीतून जागृती 

सकाळ वृत्तसेवा

देवरूख - 21 ऑक्‍टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देवरूख शिक्षणप्रसारक मंडळाच्या आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान व मतदार जागृतीसाठी रांगोळी आणि चित्रकलेच्या सादरीकरणातून सर्वांनी मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन केले आहे. 

रांगोळी व भित्तिपत्रिकेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व, भारतातील सुलभ निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील सहभागाविषयी युवकांची भूमिका व कर्तव्य, मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य, मतदार असल्याचा अभिमान, योग्य मतदान पद्धतीची गरज, सक्षम-सुदृढ आणि सुरक्षित भारताच्या अस्तित्वासाठी योग्य मतदान पद्धतीची गरज, मतदानाच्या टक्‍केवारी वाढीसाठी युवकांनी करावयाचे प्रयत्न, मतदान जागृती, "नेशन फर्स्ट- व्होट मस्ट' या विषयांचा आढावा कलेतून घेतला.

राष्ट्रीय रांगोळी कलाकार व कला मार्गदर्शक विलास रहाटे याने प्रसाद साळवी व शिवानी वहाळकर यांच्या मदतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनसमोर भव्य 60 बाय 60 फूट रांगोळी साकारून त्यातून मतदान व मतदार जागृती केली. यात मतदान केंद्रातील दिव्यांग व नागरिकांसाठी असणाऱ्या सुविधा, रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना, भारतीय नागरिक, लोकशाही व मतदान प्रक्रिया याबाबतच्या कलात्मक माहितीसह मतदान व मतदार जागृती याबाबतची घोषवाक्‍ये साकारली होती. 

Vidhan Sabha 2019 : खासदार संभाजीराजे प्रचारापासून दूरच 

"मतदान कर्तव्य आहे' 
विलास रहाटे याने "अभिमान आहे, मला मी मतदार असल्याचा!' ही व्यक्‍तिचित्रात्मक जिवंत रांगोळी रेखाटून सर्वांची वाहवा मिळवली. यश पांचाळ याचे "मतदान कर्तव्य आहे', तर रोहित कोकरे याचे "मतदान मेरा अभिमान' हे भित्तिचित्र लक्षवेधी ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT