सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोलगाव, आंबेगाव व कुणकेरी या तीन गावांसह सावंतवाडी शहराला जोडणारा कोलगाव काजरकोंड पूल खचले असून एका बाजूने मोठे भगदाड पडले. हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला असून अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात हा पूल वाहून जाण्याची भीती आहे. या ठिकाणी पूल उभारण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
काजरकोंड पूल हे सखल असल्याने दरवर्षी पावसात पाण्याखाली जाते. गेल्या दोन वर्षांपासून हे पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या स्लॅबचा काही भाग वाहून गेल्याने त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे पूल नव्याने उभारण्याची मागणी जोर धरत होती; मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने यंदा पहिल्याच पावसात भगदाड पडले.
अशा परिस्थितीतही या पुलावरुन वाहतूक सुरू होती; मात्र शनिवारी (ता. 27) रात्री भगदाडाच्या बाजूचा स्लॅब खचल्याने त्याठिकाणावरून जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. रिक्षातील महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, कोलगाव माजी सरपंच संदीप हळदणकर, कुणकेरी माजी उपसरपंच नाना सावंत, कृष्णा धुळपनावर, अब्दुल साठी, इम्तीयाज शेख, गौस मुल्ला, रवी काळोजी, बॅंजामीन रॉड्रीक्स आदींनी पाहणी केली. याबाबत योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी त्यांच्यासह मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
"" हा पूल सावंतवाडी व कोलगाव या दोघांच्या हद्दीत आहे. वादाचे मुख्य कारण पूल न होणे हे आहे. आजही पालिका प्रशासन, सावर्जनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहे. नवीन पूल उभारणीसाठी अंदाजे दोन कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्यासाठी हद्दीचा वाद मार्गी लागणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता पालिकेच्या पाळणेकोंड धरणातील मुख्य पाईपलाईन याच पुलाखालून गेली आहे. पूल वाहून गेल्यास पाईपलाईनलाही धोका आहे. त्यामुळे हा प्रश्न मिटणे आवश्यक आहे. सद्यस्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच लाख रुपये खर्ची घालून तात्पुरती डागडुजी करण्यात येणार आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. शासनाकडे नवीन पुलासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.''
- मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.