पाली : पाली बाजारपेठेतील अमोल किशोर गुप्ता यांच्या घरात घरफोडी झाली आहे. या घरफोडीत एकूण 1 लाख 47 हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (ता.7) सायंकाळी 4 ते बुधवारी (ता.8) पहाटे 12:30 च्या सुमारास घडली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी बुधवारी (ता.8) रात्री लगेच घटनास्थळी भेट दिली.
चोरट्यांनी गुप्ता यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी दरवाजाचे कुलूप काढून त्यावाटे घरात प्रवेश केला. आणि घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम काढून पोबारा केला आहे. यामध्ये 72 हजारांचे दागिने (14 व 12 वर्षांपूर्वीच्या किंमतीनुसार) व 75 हजार रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.