दापोली - पन्हाळेकाझी येथील दुर्लक्षित प्राचीन लेण्यांची पाहणी करताना नाना मोरे, अमोल मुंगशे आणि श्री. गावडे.  (हर्षल शिरोडकर - सकाळ छायाचित्रसेवा)
दापोली - पन्हाळेकाझी येथील दुर्लक्षित प्राचीन लेण्यांची पाहणी करताना नाना मोरे, अमोल मुंगशे आणि श्री. गावडे. (हर्षल शिरोडकर - सकाळ छायाचित्रसेवा) 
कोकण

दुर्लक्षित लेण्यांबाबत पन्हाळेकाझी ग्रामस्थांशी चर्चा

सकाळवृत्तसेवा

दापोली - तालुक्‍यातील दुर्लक्षित आणि एकेकाळी शिलाहार राज्याची राजधानीचे ठिकाण असलेल्या पन्हाळेकाझी या पर्यटनस्थळाच्या दुरवस्थेची पाहणी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी दाविक्षे प्रेस फाउंडेशन आणि दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २) केली. या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी सोयी-सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी ग्रामस्थांसमवेत चर्चा करून पाठपुरावा करण्याचे निश्‍चित केले.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या पन्हाळेकाझी गावातील समस्या शासनाच्या समोर आणण्यासाठी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. या वेळी दाविक्षे प्रेस फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त नाना मोरे, दापोली पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, ‘सकाळ’चे बातमीदार हर्षल शिरोडकर, अमोल मुंगशे उपस्थित होते.
शिलाहार राज्याची एकेकाळी राजधानी असलेले, पन्हाळेकाझी येथे हिंदू आणि बौद्ध प्रकारची २९ लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्धस्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. याठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात; मात्र याठिकाणी  पर्यटकांना आवश्‍यक प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना गैरसोयीचे ठरते. या ठिकाणी येण्यासाठी दापोलीतून तेरेवायंगणी मार्गे असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विश्रांतीगृह, प्रसाधनगृह यासारख्या प्राथमिक सुविधा या गावात उपलब्ध नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना येथे अधिक वेळ थांबणे शक्‍य होत नाही. प्राचीन आणि ऐतिहासिक पन्हाळेकाजी गावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्यासाठी दाविक्षे प्रेस फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT