police seize in banda sindhudurg rupees lakh alcohol found in sindhudurg
police seize in banda sindhudurg rupees lakh alcohol found in sindhudurg 
कोकण

थर्मल स्क्रिनिंगला नकार दिला आणि पोलीसांच्या जाळ्यात अडकला

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्याहून लातूरच्या दिशेने ट्रकच्या हौद्यात बनविलेल्या विशेष चोर कप्प्यातुन होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मुख्यालय पोलीस कर्मचारी धनाजी धडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाई करत ११ लाख ९० हजार ६७२ रुपयांच्या दारुसह एकूण २३ लाख ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोपाळ वाघबळ ढोमसे (वय ३२, रा. वाजरखेडा, ता. हलकी, जि. लातूर) व सतीश नामदेव कांबळे (वय २४, रा. येरगी, ता. देगलूर, जि. नांदेड) या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज पहाटे बांदा टोलनाका येथील थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाक्यावर करण्यात आली. 

या कारवाईत ११ लाख १० हजार रुपये किमतीचा ट्रक व गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे १३७ खोके जप्त करण्यात आले. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या ट्रकला (एमएच ४८ बीएम ४७८५) थर्मल स्क्रिनिंग तपासणीसाठी थांबविण्यात आले होते. चालक व क्लिनर यांचे वागणे संशयास्पद आढळल्याने पोलीस कर्मचारी धनाजी धडे यांनी ट्रकची तपासणी केली. पाठीमागील हौदा पूर्णपणे रिकामी होता. मात्र आतमध्ये विशेष कप्पा तयार करण्यात आला होता. पोलिसांनी कप्प्याची झडती घेतली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे घबाड मिळाले.

थर्मल स्क्रिनिंगला नकार दिला आणि जाळ्यात अडकला

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना बांदा टोलनाका येथे थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाका उभारण्यात आला आहे. याठिकाणी आरोग्य, महसूल व पोलिसांचे पथक २४ तास कार्यरत असते. पहाटेच्या सुमारास गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या ट्रकला तपासणीसाठी थांबविण्यात आले. चालक व क्लिनर यांनी थर्मल स्क्रिनिंग करून घेण्यास नकार दिल्याने याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी धनाजी धडे यांचा संशय बळावला. त्यांनी ट्रकची झडती घेण्यासाठी हौदा उघडण्यास सांगितले.

मात्र हौदा पुर्णपणे रिकामी होता. हौद्याच्या पुढील बाजूस नटबोल्टच्या साहायाने विशेष कप्पा केल्याचे धडे यांच्या लक्षात आले. त्यांनी कप्पा उघडला असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे विविध ब्रँडचे खोके आढळले. धडे यांच्या चाणाक्षपणामुळे पोलिसांच्या हाती दारू वाहतुकीचे मोठे घबाड मिळाले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT