कोकण

दौरा सुकथनकरांचा, फायदा शिवसेनेला

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर रत्नागिरीत आलेल्या सुकथनकर समितीला कामकाज स्थगित करायला लावत माघारी पाठविण्यात शिवसेनेने यश मिळविले. ही खेळी निवडणुकीत शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडणार आहे. त्या पाठोपाठ नाणारवासीयांची उद्धव ठाकरेंबरोबर झालेली भेटही शिवसेना तारणहार अशी प्रतिमा करण्यास आश्‍वासक ठरणार आहे. 

राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा रत्नागिरी दौरा मंगळवारी झाला. नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनमत अनुकूल करण्यासाठी कंपनीतर्फे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवर मोर्चेबांधणी सुरू होती.

प्रत्यक्ष बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्यासह प्रकल्पविरोधी शेतकरी-मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी, अशोक वालम यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या आरडाओरड्यासह मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांमुळे कामकाज चालविण्यापेक्षा तिथून निघून जाण्याचा पर्याय समितीने निवडला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाशी निगडित सर्व कामांना स्थगिती दिल्याची आठवण खासदार राऊतांनी करून दिली. 

या संपूर्ण घडामोडींचा दूरगामी परिणाम प्रकल्पावर किती होईल,याबाबत साशंकता आहे. तरीही सध्याचा निवडणुकीचा माहोल लक्षात घेता नाणार परिसरासह स्थानिक जनतेत प्रतिमा सुधारण्यासाठी शिवसेनेला या घडामोडी पोषक ठरल्या. राजकीय पातळीवर सेनेला न दुखावण्याच्या भाजपच्या धोरणाचीच रि जणूकाही समितीने ओढली.

सेना नेत्यांच्या आक्रमक भूमिकेला वेसण घालण्याऐवजी समितीने काढता पाय घेतल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले. 
कंपनीच्या प्रयत्नांना खो घालण्यात सेनेचे आमदार-खासदार यशस्वी झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचे तारणहार आम्हीच असल्याची प्रतिमा शिवसेना नेत्यांनी निर्माण करून आगामी निवडणुकांमध्ये तालुक्‍यात अनुकूल वातावरणासाठी आपल्या परीने प्रयत्न केले. सेनेबरोबरच खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला असला तरीही मंगळवारी (ता. 6) सभागृहात फक्त शिवसेनेचा प्रभाव राहिला. कारण वालमही शिवसेनेबरोबरच होते. 

इतर पक्ष फिके 
गेल्या काही काळात अशोक वालम सेनेच्या दुटप्पी भूमिकेमुळे दूर झाले होते. मात्र समितीच्या दौऱ्यात वालम हे शिवसेनेच्या सुरात सूर मिळवताना पाहिल्यावर त्यांना सेना नेत्यांनी स्वतःकडे वळवून घेतलेले दिसते. आक्रमक शिवसेनेपुढे स्वाभिमानसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध जाणवलाच नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT