कोकण

पूर्व मोसमी पावसाची कोकणातही दडी

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - पूर्व मोसमी पावसाचा पत्ता नसल्याने सिंधुदुर्गात पाण्याच्या टंचाईची तिव्रता वाढली आहे. यातच खरीपाच्या पुर्व मशागतीची कामेही रखडली आहे.  पूर्व मोसमी पावसाबाबत पूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. नगर, पालघरमध्ये वळवाच्या सरी पडल्याच नाहीत, तर सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, गोंदिया वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तीव्र ओढ दिली आहे. गतवर्षी सुरवातीच्या दोन महिन्यांत झालेल्या पावसाने धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र परतीच्या पावसाने ओढ दिल्याने हा पाणीसाठा यंदा अपुरा पडला. 

पूर्वमोसमी हंगाम संपण्यास शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. २४ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि पूर्व भागातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतच काही प्रमाणात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. नगर, पालघर जिल्हे, मुंबई शहर, उपनगरांत एक टक्काही पाऊस झाला नाही. तसेच ठाणे, हिंगोली, धुळे, नंदूरबार येथील पावसाची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तर दहा जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या १० टक्केही पाऊस पडलेला नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील चार हवामान विभागांचा विचार करता कोकणात यंदा सर्वांत कमी ०.८ मिलिमीटर (४ टक्के), विदर्भात ६.८ मिमी (२५ टक्के), मराठवाड्यात ६.१ मिमी (२७ टक्के), तर मध्य महाराष्ट्रात ८.३ मिलीमीटर (३० टक्के) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवर स्पष्ट होत आहे. 

सिंधुदुर्गात साधारण २५ मे पासून पावसाचे वेध लागतात. त्या आधी एखाददुसरा दमदार वळवाचा पाऊस होतो. यंदा मात्र जून आला तरी पूर्व मोसमी पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. यामुळे खरिपाच्या पूर्व मशागतीवर परिणाम झाला आहे.टंचाईची तीव्रताही वाढली आहे. बहुसंख्य नदीनाले सुकून गेले आहे. यामुळे जिल्हा वासियांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. 

फणी वादळाने स्थिती सुधारली
बंगालच्या उपसागरात २५ एप्रिलच्या दरम्यान तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे २७ एप्रिल रोजी फणी चक्रीवादळात रूपांतर झाले. पूर्व किनारपट्टीलागत उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली अतितीव्र होऊन तीन मे रोजी सकाळच्या सुमारात या महावादळाने ओडिशाच्या किनाऱ्याला धडक दिली. त्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊन वादळ बंगाल, बांगलादेशकडे सरकून गेले. या दरम्यान पूर्व किनाऱ्यावरील विशेषत: ओडिशा, झारखंड, पश्‍चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. तर पश्‍चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे राजस्थानसह, मध्य प्रदेशासह उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यात पूर्वमोसमी पावसाची स्थिती सुधारली. उर्वरित राज्यात मात्र पावसासाठी पोषक हवामान तयार झाले नाही. 

हवेच्या दिशेचा परिणाम
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी सांगितले, की यंदाच्या पूर्वमोसमी हंगामात कमी दाब क्षेत्र आणि कमी दाब पट्ट्यांची निर्मिती खूपच कमी प्रमाणात झाली. त्यामुळे समुद्रावरून बाष्प उपलब्ध होऊ शकले नाही. पूर्वमोसमी पावसाच्या काळात महाराष्ट्रात हवेची दिशा पश्‍चिमेकडून अपेक्षित असते; मात्र यंदा ती खूप कमी काळ पश्‍चिमेकडून, तर अधिक काळ उत्तरेकडून होती. यामुळेही पावसाच्या प्रमाणावर परिणाम झाला. यातच महाराष्ट्रात काळी जमीन असून, पूर्वमोसमी पाऊस न पडल्याने त्यातील आर्द्रता कमी होऊन उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या.

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT