preparation President Ram Nath Kovind visit Mandangad
preparation President Ram Nath Kovind visit Mandangad sakal
कोकण

मंडणगड : राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी लगीनघाई!

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या १२ फेब्रुवारीच्या आंबडवे दौऱ्याच्या तयारीला वेग आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मंडणगड तालुक्याचा दौरा केला. जिल्हा पोलिस दलासह सर्वच शासकीय यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी दौऱ्याच्या पूर्वतयारीत व्यस्त झालेले दिसून आले. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी शिरगाव येथील मैदानाला भेट दिली. या मैदानात चार पक्के डांबरीकरण केलेल्या हेलीपॅडचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मैदानातील विविध व्यवस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

महसूल यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषदचे विविध स्तरातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने उत्तम नियोजन करण्याची संधी प्रशासकीय यंत्रणेस प्राप्त झाली आहे. देशाच्या प्रमुखाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्वांनी आपली मानसिकता बदलून कामास लागा व दौरा यशस्वी करण्याचे नियोजनात सहभागी व्हा.

जिल्हाधिकाऱ्यांनी आंबडवे गावासही भेट दिली.जिल्हा पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक गेल्या चार दिवसापासून तालुक्यात दाखल आहे. सुरक्षा यंत्रणा येथील परिस्थितिचा आढावा घेत आहे. शिरगाव येथील हेलिपॅडसह भिंगळोली येथील शासकीय निवासस्थानांची डागडुजी करण्यात आली आहे. शिरगाव येथून आंबडवे येथे जाण्यासाठी बावीस किलोमीटर इतके अंतर गाडीने पार करावे लागणार आहे. यासाठी आंबडवे लोणंद हा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असावा याकरिता महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामासही सुरवात केली आहे.

इंटरनेट मिळाले पाहिजे

शिरगाव येथील हेलिकॉफ्टर तळावर स्वच्छतागृह, वीज, पाणी व इंटरनेट मिळाले पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दौऱ्यावेळी शिरगाव ते आंबडवे या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे रस्ता केवळ राष्ट्रपती व अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठीच खुला राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT