कोकण

युतीमुळे रायगडात शिवसेनेला बळ

मुझफ्फर खान

चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. 

रायगडमध्ये शेकापने मागील निवडणुकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असताना शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा काठावर पराभव झाला. यावेळी शेकापने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. सहावेळा लोकसभेत निवडून गेलेल्या गीतेंनी खासदार निधी संपवण्यापलीकडे काम केले नाही.यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी प्लस असल्याचे चित्र होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तटकरेंनी वातावरण निर्मिती सुरू केली. 

कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आघाडीतील सर्वच नेत्यांना एका व्यासपीठावर आणून योग्य तो संदेश दिला. शिवसेनेतील नाराजांच्या भेटी घेतल्या. त्याला उत्तर म्हणून शिवसेनेच्या गीतेंनी काँग्रेसमधील तटकरे विरोधी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. दोघे एकमेकांवर कुरघोडी करत असताना भाजपने काँग्रेस नेते रविशेठ पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला. युती झाली नाही तर स्वतंत्र उमेदवार देऊन शिवसेनेची विजयाची गणिते मोडण्याची व्यूहरचना भाजपने सुरू केली होती. भाजपचा छुपा पाठिंबा मिळवण्यासाठी तटकरेंकडून प्रयत्न सुरू होते. निवडणूक जिंकण्याचे सर्वच तंत्र तटकरेंना अवगत असल्यामुळे युतीविना गीतेंना निवडणूक फारच अवघड होती. 

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला युती झाल्यामुळे गीतेंना दिलासा मिळाला आहे. देशात पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार निवडून येणे ही भाजपची गरज आहे. त्यामुळे गीतेंना क्रॉस व्होटिंगचा फटका बसण्याची शक्‍यता कमी आहे. 

मुस्लिम समाज राष्ट्रवादीवर नाराज? 
कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पंडित शिक्षक आमदार आणि तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले. मात्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे नजीब मुल्ला यांचा पराभव झाला. त्यामुळे रायगड मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लिम वर्ग राष्ट्रवादीवर नाराज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT