रिफायनरीसाठी २३०० एकर मिळणार
रिफायनरीसाठी २३०० एकर मिळणार sakal
कोकण

राजापूर : बारसूमधील जमीन मालकांची संमती

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेचार हजार एकर जमिनीपैकी गोवळ, शिवणे आणि धोपेश्‍वर-बारसूमधील सुमारे २३०० एकरच्या मालकांनी प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत आपली जमीन देत असल्याची लेखी संमती दिली आहे. या संमतीपत्रामध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याची माहिती धोपेश्‍वर ग्रामीण रिफायनरी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल यांनी दिली. ज्या भागात प्रकल्प प्रस्तावितच नाही तेथील लोकांना एकत्र करून विरोध दाखवण्याचे षड्‌यंत्र नाणारनंतर आता अन्य भागात केले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी केली जात असून, त्या अनुषंगाने या परिसरामध्ये विविध प्रकारची चाचपणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. नाणारप्रमाणे गोवळ-शिवणे येथील लोकांनी रिफायनरी प्रकल्प उभारणीला विरोध केला आहे. मात्र, त्याचवेळी धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये प्रकल्प समर्थकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.प्रकल्प समर्थकांची वाढती संख्या आणि प्रकल्प जमीन देण्यासाठी जमाल मालकांकडून दिली जात असलेली संमतीपत्र याकडे खांबल यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

ते म्हणाले, ‘रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेचार हजार एकर जमिनीपैकी गोवळ, शिवणे आणि धोपेश्‍वर-बारसूमधील सुमारे २३०० एकरच्या जमीनमालकांनी प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत आपली जमीन देत असल्याची लेखी संमती दिली आहे. त्यामध्ये वाढ होत चालली आहे. ही जमीनमालकांची संमतीपत्रे येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकारी आणि एमआयडीसी विभागाला सादर करण्यात येणार आहेत. या वेळी त्यांनी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावर भाष्य केले. विरोध-विरोध म्हणून जो भासवण्यात येत आहे. त्यामध्ये एनजीओंचा पुढाकार असून त्याची योग्य ती दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात जमीनमालक कोण आणि विरोधासाठी गर्दी करणारे ग्रामस्थ कुठले? यांचा तपास पोलिस आणि महसूल यंत्रणेने करणे अपेक्षित आहे.

शिवणेत ४०० एकरच्या मालकांची संमती

शिवणे येथील ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध असल्याचे भासवण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे चारशे एकरच्या जमीनमालकांनी संमती दिल्याचे सांगताना खांबल यांनी प्रकल्पाच्या गुणदोषांवर कोणतीही चर्चा न करता सुरू असलेली प्रकल्प विरोधातील नाटके कोकणच्या विकासाच्या मुळावर उठल्याची टीकाही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT