rajapur high school student make cashew nut peeling machine
rajapur high school student make cashew nut peeling machine  sakal
कोकण

Rajapur News : हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केले काजूगर काढणारे सोलणी यंत्र

राजेंद्र बाईत

Rajapur News : शहरातील राजापूर हायस्कूलच्या आयबीटी विभागाने काही मोजक्या वस्तूंचा खुबीने उपयोग करीत कमी खर्चिक असलेले अख्खा काजूगर काढणारे ओले काजूगर सोलणी यंत्र तयार केले आहे. प्रशाळेचे आयबीटी शिक्षक अनिकेत मांजलकर, दिनेश शिंदे, देवेंद्र मांजलकर,

राहुल मांजलकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवांग मोरे आणि तन्मय तोरस्कर या दहावीतील विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केले आहे. या ओले काजूगर सोलणी यंत्राने पुणे येथे नुकतेच भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेक्नोव्हेशन प्रदर्शनामध्ये यशाची मोहोर उमटविताना दुसरा क्रमांक पटकाविला.

राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सुयश संपादन केल्याबद्दल राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष डॉ. छाया जोशी, संस्था कार्यवाह प्रकाश भावे, उपाध्यक्ष अभय मेळेकर,

कार्यकारी मंडळाचे कार्यवाह जगदीश पवार, मुख्याध्यापक जगदीश भालशंकर, उपमुख्याध्यापक अरूण पोवार, पर्यवेक्षक मधुकर तोडकर यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

सुक्या काजूंच्या दरामध्ये सातत्याने होणार्‍या कमी-जास्तपणाचा प्रतिकूल परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर होत आहे. त्या तुलनेमध्ये ओल्या काजूगरांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आणि दरही मिळत असल्याने गेल्या काही वर्षामध्ये शेतकरी, बागायतदार यांच्याकडून ओले काजूगर काढून विकण्यावर भर दिला जात आहे.

मात्र, हाताच्या सहाय्याने अख्खा काजूगर काढणे कठीण होते. अशा स्थितीमध्ये राजापूर हायस्कूलच्या आयबीटी विभागाने तयार केलेले कमी खर्चिक ओले काजूगर सोलणी यंत्र शेतकरी, बागायदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

राजापूर हायस्कूलच्या आयबीटी विभागाने गतवर्षी सुकी सुपारी सोलणी यंत्र विकसित केले होते. या यंत्रालाही राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये क्रमांक पटकाविला होता. या यशामध्ये सातत्य ठेवत प्रशाळेतर्फे यावर्षी तयार केलेल्या ओले काजूगर सोलणी यंत्राणेही राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये दुसरा क्रमांक पटकावून सलग दुसर्‍या वर्षीही सुयश संपादन केल्याची माहिती आयबीटी शिक्षक अनिकेत मांजलकर यांनी दिली.

  • ओले काजूगर सोलणी यंत्राची वैशिट्ये

  • यंत्र निर्मितीसाठी सागवानी लाकडू, स्टीलचे पाते यांचा उपयोग

  • यंत्र निर्मितीसाठी तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्च

  • यंत्राच्या सहाय्याने अख्खा काजूगर काढणे अधिक सोपे

  • काजूगर काढण्यासाठी शेतकरी, बागायतदारांसाठी फायदेशीर

“ सागवानी लाकडू, स्टीलचे पाते अशा मोक्या वस्तूंचा उपयोग करून ओले काजूगर सोलणी यंत्र तयार करण्यात आले आहे. तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चिक असलेल्या या यंत्राच्या सहाय्याने अख्खा काजूगर काढणे अधिक सुलभ आहे. काजू बियांमध्ये अख्खा काजूगर काढण्यासाठी शेतकर्‍यांसाठी निश्‍चितच हे यंत्र फायदेशीर ठरेल असा विश्‍वास वाटतो. ”

- अनिकेत मांजलकर, आयबीटी शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT