mahad.
mahad. 
कोकण

Bharat Bandh : सरकार विरोधी घोषणा देत महाडमध्ये मोर्चा

सुनील पाटकर

महाड - वाढती महागाई आणि इंधनांची गगनाला भिडलेल्या  भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडून अतिशय शिस्तीत मोदी सरकार विरोधी घोषणां देत महाड शहरातून सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

मोदी आणि फडणवीस सरकार विरोधी घोषणांनी महाड दुमदुमून गेले होते. या मोर्चात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, हनुमंत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत म्हामुणकर, उपनगराध्यक्ष सुषम यादव, बांधकाम सभापती संदीप जाधव,माजी नगराध्यक्ष सुर्यकांत शिलीमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत जाधव, निलेश महाडिक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, मनसेचे शहराध्यक्ष बंटी पाटील, आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस कार्यालयापासून निघालेला मोर्चा शिवाजी चौक, चवदार तळे, बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकरी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन सादर केले.मोर्चाच्या वेळी महाड बाजारपेठेतील बहूसंख्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती परंतु गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत असलेल्या गर्दीमुळे हळूहळू हि दुकाने सुरु करण्यात आली. शहरातील एसटी व इतर वाहतूकही सुरळीत सुरु होती. शाळा महाविद्यालये व दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरु होते. मोर्चात कुठेहा हिंसक व अनुचीत प्रकार घडला नाही. सामान्य जनतेला महागाई, गँस, पेट्रोल व जीएसटीने हैराण केलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोलादपूर बाजारपेठेत शुकशुकाट
भारत बंदला पोलादपूरमध्येही व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामिण भागातील ग्राहक बंदमुळे बाजारपेठेत न आल्याने पोलादपूर बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापा-यांनी दुपारनंतर दुकाने सुरु केली परंतु बंदमुळे बाजारात मंदीचे सावट होते. काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT