मिरकरवाडा बंदर
मिरकरवाडा बंदर sakal
कोकण

रत्नागिरी : मासळी उतरविण्यात अव्वल, विक्रमही

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मासळी उतरवण्याच्या क्रमवारीत गेल्या पंचवीस वर्षांपासून मिरकरवाडा बंदराने अव्वल क्रमांक राखला आहे. दरवर्षी या बंदरावर इतर सर्व बंदरांपेक्षा अधिक मासळी मच्छीमार नौकांमधून उतरवली जाते.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीवर ३ हजार ५१९ यांत्रिकी नौका, तर ४४२ बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करतात. समुद्रातून आणलेली मासळी उतरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ४३ लँडिंग सेंटर आहेत. झोननुसार मासे उतरवण्याच्या केंद्रांची वर्गवारी केली असून आतापर्यंत मिरकरवाडा बंदर सरस ठरले आहे.

मिरकरवाडा बंदरात प्रामुख्याने पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौकांमधील मासळी उतरवली जाते. त्याचबरोबर या बंदरावर देशातील अनेक राज्यांमध्ये मासळी पाठविण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर मासळी निर्यात करणाऱ्‍या पाच कंपन्यांही असल्याने येथील मासळीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.

मिरकरवाडा बंदरात १९९५-९६ साली १० हजार ८० टन मासळी उतरवण्यात आल्याची नोंद आहे. २०२०-२१ मध्ये हेच प्रमाण ३० हजार ८२९ टन इतके आहे. या गेल्या पंचवीस वर्षांत मिरकरवाडा बंदराने मासळी उतरवण्याच्या क्रमवारीत पहिला क्रमांक कायम राखला आहे. मासेमारी करणाऱ्‍या नौकांची संख्या गेल्या पंचवीस वर्षांत वाढत गेली असली तरी मासळी उत्पादन बंदरावर उतरवण्याच्या प्रमाणात काही फरक पडलेला नाही. पाच वर्षांपूर्वी पर्ससीननेट मासेमारी सप्टेंबर ते मे महिन्यापर्यंत अशी आठ महिने चालायची. त्यावेळी मासळी उतरवण्याचे प्रमाण फारच मोठे होते. २०१४-१५ मध्ये हेच मासळी उतरवण्याचे प्रमाण ७४ हजार २३४ टन इतके होते.

८,९५९ टन इतकी मासळी उतरली

मासळी उतरवण्याच्या बंदरातील बुरोंडी, दाभोळ, रत्नागिरी हे झोन आहेत. रत्नागिरी झोनमध्ये जयगड, मिऱ्याबंदर, काळबादेवी, साखरतर आदी बंदरे येतात. मिरकरवाडा हा स्वतंत्र झोन असून हे सर्वात मोठे आणि प्रमुख बंदर आहे. सन २०२०-२१ मध्ये ८ हजार ९५९ टन इतकी मासळी बुरोंडी बंदरावर उतरली गेली आहे.

तरी फरक पडलेला नाही

पर्ससीन, मिनी पर्ससीननेट मासेमारीवर कालावधी, समुद्रक्षेत्राच्या मर्यादा आल्या असल्या तरी समुद्रातील मासळीचे उत्पादन मिरकरवाडा बंदरावर उतरवण्याच्या प्रमाणात काही फरक पडलेला नाही.

एक नजर..

  • जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला १६७ कि. मी.

  • किनारपट्टीवर यांत्रिकी नौका ३ हजार ५१९

  • बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करतात ४४२

  • मासळी उतरवण्यासाठी जिल्ह्यात लँडिंग सेंटर ४३

  • मिरकरवाडा बंदरावर एक दृष्टिक्षेप...

  • देशातील राज्यांमध्ये मासळी पाठविण्याची व्यवस्था

  • मासळी निर्यात करणाऱ्‍या पाच कंपन्यांही

  • झोननुसार मासे उतरवण्याच्या केंद्रांची केली वर्गवारी

  • आतापर्यंत मिरकरवाडा बंदर ठरले सरस

  • दरवर्षी इतर सर्व बंदरांपेक्षा अधिक मासळी उतरवतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT