कोकण

नियोजनशून्य विस्तारामुळे मंडणगड बकाल

सचिन माळी

मंडणगड - शहरात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. शिवाय शहराला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. वाढती बांधकामे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, मूलभूत सोयीसुविधा असे अनेक प्रश्‍न शहराला भेडसावत आहेत. नियोजनशून्य विस्तार आणि समस्यांकडे दुर्लक्ष, दूरदृष्टी असलेल्या नेत्यांचा अभाव यामुळे मंडणगड उत्तम पर्यटनस्थळ होण्याऐवजी बकाल शहर बनत आहे.

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत सुविधांची वानवा असल्याने नागरिकांपुढे अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. ठिकठिकाणी साचलेला कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे शहर स्वच्छ भारत अभियानापासून दूर आहे. सार्वत्रिक आरोग्य जपण्यासाठी स्वच्छतेला महत्त्व आले आहे. नगरपंचायत स्थापनेमुळे शहराला विकासाची संधी आहे.

मुंबई, पुणे या दोन महानगरांपासून केवळ चार तासांच्या अंतरावर असलेल्या मंडणगड शहरात बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन व्यवसाय तेजीत आहे. अनेकांनी सेकंड होमसाठी मंडणगड शहराला पसंती दिली आहे. येथून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे साठ-सत्तर किलोमीटरच्या अंतरात आहेत. याशिवाय तालुक्‍यातील सर्वच गावांना शैक्षणिक, आरोग्य आणि बाजारपेठेसाठी मंडणगड सोयीचे आहे. त्यामुळे शहरात निवासी संकुलांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे.

शहरीकरणाच्या तुलनेत सुविधा तोकड्या पडत आहेत. आजबाजूच्या ग्रामपंचायतींचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. भिंगळोली ग्रामपंचायतीने महसूलच्या बाबतीत नगरपंचायतीशीही स्पर्धा केली आहे. बस स्थानक वगळता एकही सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालय उभारण्यात आलेले नाही. बाजारपेठ व शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.  पार्किंग व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होते. सणासुदीला पोलिसांना पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणासाठी कसरत करावी लागते.

वाढत्या बांधकामामुळे बाणकोट, पाट रस्ता तसेच उपरस्त्यांशेजारील सांडपाण्याचे व्यवस्थापन नीटपणे झालेले नाही. पावसाळ्यात गटाराअभावी पाणी साचते. सांडपाणी उघड्या गटारात सोडण्यात आले. ते रस्त्यावर आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 

कचरा प्रक्रिया गरजेची
ओला-सुका कचरा टाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. महामार्गाशेजारी ओहोळात कचरा टाकला जातो. झोपडपट्टी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, सांडपाणी यासाठी उपाययोजना आवश्‍यक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT