कोकण

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्‍ये आरटीजीएस, एनईएफटी सेवा

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - अद्ययावत संगणकीकृत सेवांसोबत आता जिल्ह्यातील अग्रमानांकित स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आरटीजीएस, एनईएफटीसह एसएमएस अलर्ट सेवा ग्राहकांना देण्यास सुरवात केली आहे. नोटबंदीनंतर बदलत्या आर्थिक व नवतंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात वावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत ग्राहकांना सेवा दिली पाहिजे, या हेतूने प्रारंभ केला. ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी सेवा देण्यास सुरवात केल्यानंतर लगेचच ग्राहकांनीही याला लाभ घेण्यास उत्साह दाखवला आहे. पैसे वर्ग करणे, जमा करणे, करण्यासाठी सेवा देण्याचा प्रारंभ करताच शेकडो ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.

वेगवान पद्धतीने व अचूकपणे पैसे पाठविणे अगर जमा करून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्‍त ठरत आहे. ग्राहक खात्यामध्ये रक्कम जमा केल्यास, काढली, वर्ग केली, हप्ता भरला तर त्या संबंधीचा एसएमएस त्वरित ग्राहकांना दिला जातो. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर झालेल्या व्यवहारांसदर्भाने सुविधा देण्यात येते. व्यवहारामध्ये जलद गती यावी, अचूकता व पारदर्शकता राहावी, ग्राहकाशी सदैव जोडलेले राहावे, यासाठी नवीन तंत्रज्ञानाची कास धरत संस्थेने या सेवा सुरू केल्या आहेत. त्याचे खूप सकारात्मक पडसाद उमटत आहेत. संस्थेकडचे व्यवहार वाढण्यात या सेवांचे पर्यवसान होत आहे असे पटवर्धन यांनी सांगितले.

लवकरच स्वमालकीच्या अद्ययावत कार्यालयात पुणे शाखा कार्यरत होणार आहे. मेट्रो सिटीमध्ये जाताना कोकणातली ही संस्था संपूर्ण अद्ययावत सेवा देणारी संस्था म्हणून साकार करण्याचा प्रयत्न आहे. रत्नागिरीतील नागरिक प्रामुख्याने युवक, युवती पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांना आर्थिक सुविधा देऊन हा ग्राहक वर्ग जोडण्याचा संकल्प आहे. आजपर्यंत संस्थेने विश्‍वासार्ह, शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार केले. या जोडीला वेगवान सेवा देत युवा वर्गाला संस्थेशी जोडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

एटीएम सुविधा, ॲप लवकरच
नजीकच्या काळात अन्य बॅंकांच्या सहकार्यातून एटीएम सुविधा पुरवण्यासाठी धोरण आखले जात आहे. तसेच अन्य डिजिटल सुविधा तसेच संस्थेचे ॲप निर्माण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT