कोकण

रिफायनरी विरोधात शिवसेनेचा स्वतंत्र लढा - खासदार राऊत

सकाळवृत्तसेवा

राजापूर - कोकणच्या मुळावर आलेला प्रकल्परूपी राक्षस शिवसेनाच रद्द करू शकते, असे ठणकावत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भविष्यात कोणत्याही समितीसोबत न जाता शिवसेना प्रकल्पविरोधात स्वतंत्र लढा उभारणार असल्याची घोषणा केली.

रिफायनरी प्रकल्पविरोधी समित्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात असतानाच आज खासदारांनी त्याला प्रत्युत्तर दिले. शिवसेनेवर वारंवार टीका करणारे प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांचाही खरपूस समाचार घेताना स्वार्थासाठी कोणाचा ठेका घेऊन ते शिवसेनेची बदनामी करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीवरून शिवसेना आणि प्रकल्पग्रस्त समित्यांचे पदाधिकारी यांच्यामध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. श्री. वालम यांनी काही दिवसांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले आहे. त्याला राऊत यांनी आज सागवे आणि कुंभवडे येथे झालेल्या सभेत प्रत्युत्तर दिले. 

या वेळी गणपतराव कदम, चंद्रप्रकाश नकाशे, प्रकाश कुवळेकर, जगदीश राजापकर, शिक्षण सभापती दीपक नागले, सुभाष गुरव, अश्‍विनी शिवणेकर, राजा काजवे, उमेश पराडकर, रामचंद्र सरवणकर, दिनेश जैतापकर, सोनम बावकर, लक्ष्मी शिवलकर, प्रशांत गावकर, कमलाकर कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांना लवकरच निवेदन
स्वार्थासाठी कोणाचा तरी ठेका घेऊन टीका करणाऱ्या वालम यांनी तातडीने ती थांबवावी. प्रकल्पविरोधी समिती वा अन्य कोणाच्याही साथीने न जाता शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल. प्रकल्पाला विरोध असलेल्या जमीन मालकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT