कोकण

कचरामुक्त खेड आणि ग्रीन सोसायट्यांवर भर

सकाळवृत्तसेवा

खेड - कचरामुक्त खेड, शून्य कचरा, ग्रीन सोसायटी या मुद्द्यांवर खेड पालिकेने भर दिला असून समर्थनगर येथील डंपिंग ग्राउंड येथे कचरा वर्गीकरण प्लॅट लवकरच उभारला जाणार आहे. ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर या प्लॅंटमधून प्रक्रिया होईल. या कचऱ्यापासून खत व विटांची निर्मिती करण्यात येईल. विटांचा वापर एमआयडीसीमध्ये होऊ शकतो, असा शहर कचरामुक्त करण्याचा अजेंडा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मांडला.

‘सकाळ’शी बोलताना खेडेकर म्हणाले, की यापूर्वी डंपिंग ग्राउंडसाठी सुकिवली, कर्टेल, पोयनार या गावातील जागांचा विचार करण्यात आला होता. तसा प्रस्तावही तयार होता. पण तीनही गावांच्या ग्रामसभेने हा प्रस्ताव फेटाळल्याने आता शहरातील समर्थनगर येथील डंपिग ग्राउंडवर कचरा वर्गीकरण प्लॅंट उभारण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. शून्य कचरा या मुद्द्यावर काम करताना प्रत्येक घरासाठी ओल्या व सुक्‍या कचऱ्यासाठी दोन वेगवेगळी डस्टबिन देणार असून दोन कचरा गाड्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. पालिकेच्या मागील निवाचा चौक येथील व गांधी चौकातील सार्वजनिक शौचालये पाडून अद्ययावत शौचालये बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरात मोबाईल शौचालये उभारण्यात येतील. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, महिन्याभरात ७० लाखांची पाईपलाईन, गुलमोहर पार्कसाठी कार्यान्वित करणार, सीएसआर फंडातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणार. अपघातात मृत्यू झाल्यास राजकीय लोक फक्त सांत्वन करतात, परंतु भरीव काम करण्याच्या हेतूने प्रत्येक करदात्याचा एक लाखाचा अपघात विमा काढून त्याचा हप्ता पालिका भरणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत एक हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण करणार. ही सारी कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT