pali
pali 
कोकण

सुधागड तालुक्यात पेडली येथील दुकानात दरोडा

अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यातील पेडली बाजारपेठेत किराणा मालाच्या दुकानात सशस्त्र दरोडा पडला. ही घटना गुरुवारी (ता. 24) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्राहक बनून पुजेच्या सामानाची यादी देवून गेलेल्या व्यक्तींनी पुजेचे सामान घेवून जाण्याच्या बहाण्याने येथील व्यापारी विलास बाबुलाल पालरेचा यांना पिस्तुल व चाकू, सुर्‍याचा धाक दाखवून लुटले. झटापटीत पिस्तुल व हत्यारे तिथेच टाकून मुद्देमाल घेवून पांढर्‍या रंगाच्या वाहनातून लुटारुंनी पोबारा केला. या खळबळजनक घटनेने येथील नागरिक व व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विलास पालरेचा या व्यापार्‍याचे पेडली गावाच्या नाक्यावर किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी (ता.24) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास काही अनोळखी व्यक्ती पालरेचा यांच्या दुकानात आल्या होत्या. त्यांनी पालरेचा यांच्याकडे पुजेच्या साहित्याची यादी दिली व सामान बांधून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर रात्री पावनेदहाच्या सुमारास पालरेचा यांचे दुकान बंद झाल्यावर सामानाची यादी दिलेले तीन अनोळखी व्यक्ती सामान घेण्यासाठी पालरेचा यांच्या दुकानात आले. पुजेचे साहित्य असल्यामुळे पालरेचा यांनी ते देण्यासाठी दुकान उघडले. यावेळी गल्ल्यात ठेवलेली यादी घेण्यासाठी पालरेचा दुकानाच्या आत गेले. यावेळी त्यांच्यापाठोपाठ एक व्यक्ती आत शिरला. व त्याने आपल्याकडील पिस्तुल पालरेचा यांच्या डोक्यावर लावली. याचवेळी दुसर्‍या दोन व्यक्तीदेखील दुकानात शिरल्या व त्यांनी सुरा व चाकुचा धाक दाखविला. व धमकावून विलास पालरेचा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन, बोटातील सोने व चांदीच्या तीन अंगठ्या असे जवळपास 1 लाखाचे दागिने हिसकावून घेतले. या झटापटीत गल्ल्यातील चिल्लर खाली पडली. या आवाजाने विलास पालरेच्या यांची पत्नी पुनम पालरेचा व मुलगा हर्ष पालरेचा बाहेर आले. व समोरील दृष्य बघून त्यांनी आरडओरडा सुरु केला. यावेळी दरोडेखोरांनी त्यांना देखील धमकावले. यामध्ये पुनम पालरेचा जागीच भुरळ येवून पडल्या. त्याबरोबर दरोडेखोरांनी तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. धावपळीत दरोडेखोरांचे पिस्तुल व हत्यार तिथेच पडले.  व्यापारी विलास पालरेचा यांनी मोठी हिंमत दाखवून दरोडेखोरांचा पाठलाग केला. थोड्या अंतर गेल्यावर ते एका गटारात पडले. यावेळी दरोडेखोर्‍यांनी रस्त्यावर बाहेर उभ्या केलेल्या चार चाकी वाहनात बसून तिथून पलायन केले. 

घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह सहाय्यक फौजदार पाटील, पो.ह. एस.एस.खेडेकर, पो.कॉ. आर.डी.शिंदे, एम.व्ही.लांगी हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी ठिकाणचा तत्काळ पंचनामा केला. शुक्रवारी (ता. 25) सकाळी श्वानपथकाच्या सहाय्याने या दरोड्याचा तपास सुरु करण्यात आला. पेडली बाजारपेठेत दरोडा पडला असल्याची माहिती मिळताच माजी जि.प सदस्या गिता पालरेचा, माजी सरपंच मिलिंद बहाडकर, संजय देशमुख, पोलीस पाटील श्रध्दा देशमुख, विशाल गुरव आदिसंह पेडलीतील व्यापारी व नागरीकांनी विलास पालरेचा कुटुंबियांची भेट घेतली व आधार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT