Sexual harassment of a minor girl Six Persons arrested
Sexual harassment of a minor girl Six Persons arrested 
कोकण

अल्पवयील मुलीवर लैंगिक अत्याचार ; सहा जण अटकेत

सुनील पाटकर

महाड : पैशाचे आमिष दाखवून महाड शहारातील एका अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महाडमधील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी मात्र फरार झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून ती या प्रकरणातील सूत्रधार असल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. या धक्कादायक प्रकाराने महाड शहर चांगलेच हादरले. 

महाडमधील काकरतळे भागातील एका 17 वर्षीय मुलीला करंजखोल गावातील स्वाती धुमाळने पैशाचे आमिष दाखवत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. सप्टेंबर 2017 ते 12 आक्टोबर 2018 या कालावधीत या अल्पवयीन मुलीवर महाडमधील सहा जणांनी तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात तिने स्वतः तक्रार दाखल केली आहे.

अल्पवयीन मुलीला या अनैतिक संबंधास भाग पाडलेल्या स्वाती बळीराम धुमाळ (वय 35, रा.करंजखोल) व तिच्यावर अत्याचार करणारे प्रवीण यशवंत निकम वय( 53, रा.करंजखोल), श्रवण बटवरसिंग राजपूत (वय 22), अजय उर्फ अजित रामचंद्र पवार  (वय 25), उमेश मोतीराम सावरे (वय 25), रणजीत रमेश नातेकर (वय 37) सर्व राहणार महाड या सहा जणांना अटक करण्यात आली तर निलेश शिंदे हा फरार झाला. पोलिस निरीक्षक शैलेश सणस हे या प्रकरणाचा तपास करीत असून या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT