कोकण

Loksabha 2019: शिवसेना, स्वाभिमानकडून शक्‍तिप्रदर्शनाची तयारी

सकाळवृत्तसेवा

कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आणि नियोजन या दोन्ही पक्षांकडून सुरू झाले. शिवसेनेचे विनायक राऊत आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर ३० मार्चला, तर ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे नीलेश राणे आणि वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी १ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचे विनायक राऊत आणि ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे नीलेश राणे यांच्यात मुख्य लढत होईल. काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी अर्ज दाखल करणार असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गात चौरंगी लढतीची शक्‍यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले जाईल. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून भरभक्कम तयारी सुरू आहे. शनिवारी (ता. ३०) श्री. राऊत अर्ज दखल करतील. या वेळी युतीमधील भाजप आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनीही युतीचा धर्म पाळावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांचा रुसवा अद्यापही दूर झालेला नाही.

श्री. राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल, त्या वेळी जेवढे कार्यकर्ते असतील त्याच्या दुप्पट कार्यकर्ते असावेत, यादृष्टीने ‘स्वाभिमान’कडून गावनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे. तसेच, गावागावांत पक्षप्रवेश सोहळे करून वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. एलईडी आणि पर्ससीन मच्छीमारांच्या प्रश्‍नावरूनही विद्यमान खासदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT