कोकण

एलईडी मासेमारीला राज्याची बंदी

सकाळवृत्तसेवा

मालवण - देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने प्रकाशझोतातील (एलइडी) मासेमारीस बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या १२ सागरी मैल या राज्याच्या हद्दीत प्रकाशझोताचा वापर करून मासेमारीस तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घातली आहे. ही माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली. 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौका व त्यांना साहाय्य करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येईल अशी अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने जारी केली आहे. केंद्राने देशाच्या सागरी हद्दीत प्रकाशझोतातील मासेमारीस बंदी घातली होती; मात्र राज्याच्या सागरी  हद्दीत अशी बंदी नसल्याने पारंपरिक व प्रकाशझोतातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या कृषी आणि किसान मंत्रालय, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन विभागाने राज्यासह राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात किंवा जलधी क्षेत्राबाहेर एलईडी लाइट वापरून मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करावी अशा सूचना दिल्या आहेत. 

राज्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ याच्या कलम ३ नुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करून राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात म्हणजेच १२ सागरी मैल क्षेत्रात ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी  नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाइट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी  कृत्रिम उपकरणे यांचा वापर करणे किंवा ती बसविणे  याला प्रतिबंध घातला आहे.

बुल ट्रॉलिंगलाही पायबंद
याचबरोबर राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात १२ सागरी मैल परिसरात बुल, पेअर ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन करणाऱ्या  मासेमारी नौका, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या व आधार, पुरवठा करणाऱ्या संलग्न नौकांवर कारवाई केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT