कोकण

मालवणातील समुद्रात अवतरल्या रंगीत लाटा

प्रशांत हिंदळेकर

मालवण - येथील समुद्रात बुधवारी (ता. ३१) रात्री ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ अनुभवायला मिळाली. शहरातील किनारपट्टी भागात अनोख्या चकाकत्या रंगीत समुद्री लाटा निर्माण झाल्याचे दिसून आले. रंगीत समुद्री लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी किनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

बायोलुमिनेसन्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रंगीत लाटांना स्थानिक भाषेत ‘झारो लागणे’ असे संबोधले जाते. समुद्र व खाडीच्या पाण्याच्या होणाऱ्या घुसळणीने ही प्रक्रिया निर्माण होत असल्यानेच अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. येत्या संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

किनारपट्टी भागात रात्री ज्या रंगीत लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत त्यांना स्थानिक भाषेत झारो लागणे असे म्हटले जाते. खाडी व समुद्रातील पाणी यांच्यात घुसळणीची प्रक्रिया होत असल्याने खाडीतून येणारे सूक्ष्म जीव व शेवाळ यामुळे रंगीत लाटा निर्माण होत आहे. सध्या बारा फॅदमच्या अंतरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असून ती येत्या संकष्टीपर्यंत सुरू राहणार आहे.
- महेंद्र पराडकर,
मत्स्य अभ्यासक

सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. या हंगामात जेवढी थंडी तेवढे ऊन तसेच जेवढी भरती तेवढीच ओहोटी होत असल्याने खाडीतील शेवाळ तसेच अन्य सूक्ष्म जीव समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने घुसळण होऊन ही प्रक्रिया निर्माण होत आहे. सध्या समुद्रातील बारा फॅदमपर्यंत ही प्रक्रिया होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या थंडीच्या वातावरणात ही प्रक्रिया सुरू असते. भरती, ओहोटीच्या काळात खाडीतील सूक्ष्मजीव तसेच अन्य छोटी प्रवाळे समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने ही प्रक्रिया होत आहे. प्रक्रियेला बायोलुमीनेसन्स म्हणून ओळखले जाते. समुद्रातील सूक्ष्म जीवांमुळेच समुद्री लाटा रंगीत दिसून येतात. या हंगामात किनारपट्टी भागात अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. आकर्षक अशा या रंगीत लाटा पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळाली आहे.
- डॉ. सारंग कुलकर्णी,
सागरी जीवसंशोधक

थंडी व ऊन यामुळे समुद्रातील सूक्ष्म जलचरांना लकाकी प्राप्त होत असल्याने रात्रीच्यावेळी समुद्राच्या रंगीत लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत आहेत. काल चंद्रग्रहण होते यात काही नागरिक येथील बंदर जेटी परिसरात फेरफटका मारण्यास गेले असताना त्यांना किनाऱ्यावर रंगीत लाटा धडकत असल्याचे दिसून आले. याची माहिती सर्वत्र पसरताच शहरातील नागरिकांनी रंगीत लाटा पाहण्यासाठी बंदर जेटी परिसरातील किनाऱ्याकडे धाव घेतली होती. रॉकगार्डन परिसर, चिवला वेळ, दांडी येथील किनाऱ्यावर या रंगीत लाटांचे दर्शन होत होते. 

अजब रंगीत लाटा पाहिल्यावर चंद्रग्रहणामुळेच असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात यासंदर्भात स्थानिक मच्छीमारांशी संपर्क साधला असता थंडीच्या हंगामात ही प्रक्रिया होत असल्याने अशा रंगीत लाटा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भरती व ओहोटीच्या काळात खाडीपात्रातील शेवाळ तसेच अन्य सूक्ष्म जीव समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने तसेच जेवढी थंडी तेवढेच ऊन लागत असल्याने या सूक्ष्म जिवांना झळाळी प्राप्त होत आहे. यात समुद्राच्या पाण्यास एवढी लकाकी प्राप्त होते की समुद्रातील मासळीला मच्छीमारांनी टाकलेले जाळेही दिसून येते. त्यामुळे मासळी जाळी टाकलेल्या भागात फिरकतही नाही. यामुळे सध्या गिलनेट पद्धतीने होणारी मासेमारी पूर्णतः बंद असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. येत्या संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने या काळात दररोज रात्री समुद्राच्या रंगीत लाटा किनाऱ्यावर दिसून येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT