कोकण

मालवण-दांडीमध्ये समुद्रात वॉटरपार्क

सकाळवृत्तसेवा

मालवण -  येथील समुद्राखालील अनोख्या विश्‍वाची भुरळ देशी, विदेशी पर्यटकांना पडली आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंगचा आनंद लुटण्यास येणाऱ्या पर्यटकांना तसेच बच्चे कंपनीला पर्यटनाचा वेगळा आनंद लुटता यावा, यासाठी बेरोजगार, स्थानिक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक अशा चाळीस जणांनी या महिन्यात एकत्र येत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांची गुंतवणूक करून समुद्रात दांडी बीच सी वॉटरपार्क हा प्रकल्प साकारला आहे.

पर्यटन जिल्ह्यात शासनाकडून वेगळे उपक्रम राबविणे गरजेचे असताना शासनाची कोणतीही मदत न घेता स्थानिकांनी कोकण किनारपट्टीवरील हा पहिला सहकार तत्त्वावरील प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना वेगळा आदर्श घालून दिला आहे. या महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

जागतिक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अशाप्रकारचे वॉटरपार्क प्रकल्प समुद्रात उभारले जातात. बच्चे कंपनीसह पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी असते. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना नावीन्यता देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत या पर्यटन प्रकल्पाची उभारणी केली आहे. स्थानिक मच्छीमारांना व अन्य वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांना कोणताही त्रास न होता येथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकल्पाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

बंदर विभागालाही याबाबत पत्र देण्यात आले असून, सर्व प्रकारच्या परवानगीची पूर्तता करून या वॉटरपार्क प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा मानसही आज दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे झालेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. 

वॉटरपार्क प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेटसह अन्य सर्व सुरक्षेच्या उपाययोजना असणार आहेत. जीवरक्षकांची नियुक्तीही केली जाणार आहे. येथे आलेल्या पर्यटकाला सुरक्षितरीत्या पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी कोणतीही कमी ठेवली जाणार नाही. अगदी माफक दरात जास्त सुरक्षा व जास्त पर्यटन आनंद ही संकल्पना राबविली जाणार आहे.

कोणत्याही प्रकारे मासेमारी व्यावसायिकांना या वॉटरपार्कचा अडसर होणार नाही. या हेतूने अगदी किल्ले सिंधुदुर्गच्या समोरच केवळ काही फूट कामात या वॉटरपार्कची उभारणी सुरू आहे. उभारणी दरम्यान अनेक पर्यटक वॉटरपार्कमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. मात्र, लवकरच उभारणी पूर्ण झाल्यावर पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, असे व्यावसायिकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT