कोकण

सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दुपारनंतर वातावरणात झालेल्या अचानक बदलानंतर गडगडाटासह पावसाचे आगमन ( Sindhudurg Arrival of Rain)झाले. काही मिनिटेच हा पाऊस कोसळला. त्यामुळे वातावरणात काहीसा ओलावा जाणवला.

Sindhudurg rain update marathi kokan news

सध्या वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे त्यामुळेच उकाड्याने नागरिक हैराण होत आहे. शुक्रवारी दिवसभर तालुक्यात वातावरणात उष्णतेचे प्रमाण जास्त होते. याचा परिणाम लक्षात घेता शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

एकीकडे जिल्ह्यात चक्रीवादळ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला असतांना आणि त्याबरोबर जोरदार पावसाची शक्यता असताना आज वातावरणात झालेला बदल आणि कोसळलेल्या पावसाच्या सरी लक्षात घेता त्याचेच संकेत असल्याचे जाणवले.

शहरात पावसाच्या सरी कोसळल्यातरी ग्रामीण भागात मात्र उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते. काही भागात हलक्या सरी कोसळल्या मात्र बऱ्याच ठिकाणी एक थेंबही पडला नाही. मात्र पावसाच्या शक्यतेने ग्रामीण भागातील नागरिकांची काहीशी ताराबंळ उडाली. चक्रीवादळाच्या संकेतामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यापुर्वीची कामे आटोपती घेण्याची घाई सुरु असतांना आजच्या पावसाच्या शक्यतेने अनेकांना धावपळ करावी लागली. तर पावसाच्या सरी कोसळून गेल्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती.

Sindhudurg rain update marathi kokan news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT