konkan.
konkan. 
कोकण

बैलाला नाल मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा

अमित गवळे

पाली - शेतात राबणाऱ्या व बैलगाडी ओढणाऱ्या बैलाचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांना नाल मारली जाते. दहा-पंधरा वर्षांपुर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजित होता. मात्र ट्रॅक्टर - टेम्पो आले, शेतकर्याने शेतीकडे फिरविलेली पाठ यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू लागला आहे.

मागील ३२ वर्षांपासून वडिलोपर्जित नाल मारण्याचा व्यवसाय करणारे येथील नजीर नालबंद म्हणाले की बैलगाडीवाल्याला आता कोणी विचारत नाही. शेतीपण कोणी करत नाही. पुर्वी या धंद्याला खुप चलती होती. दिवसाला कमाई देखिल चांगली व्हायची. एखाद्याकडे दहा जोड्या मारल्या आणि त्याने एका जोडीचे पैसे उधार ठेवले तरी परवडायचे. मात्र आता एका जोडीला पत्री मारल्यावर उधारी केल्यास हाती काहीच मिळत नाही. याधी बैलगाडी व्यवसाय व शेतीची कामे सुरु असल्याने वर्षातून दोन-तीन वेळा एका बैलाला पत्री मारली जायची मात्र आता एकदाच पत्री मारतात. धंद्यात मजा राहिली नाही. एका बैलाला पत्री मारण्याचे ३०० रुपये मिळतात. मात्र नाल, खिळे, साहित्य व प्रवास खर्च मिळून हाती फारच थोडी रक्कम राहते. मुंबईवरुन पत्रे (नाल) तर पुण्यावरुन खिळे आणावे लागतात. नजीर जिल्हयात विविध ठिकाणी आपले साहित्य घेवून फिरतात. मात्र धंदा फारच कमी होतो. त्यांचा मुलगा व भाचा देखील या व्यवसायात आहे. मात्र त्यांचेही भविष्य टांगणीला लागले असल्याचे नजीर यांचे म्हणणे आहे.

जीवितास धोका
जनावर पाडतांना खबरदारी घ्यावी लागते. चलाखी करावी लागते. बर्याचवेळा बैल लाथ मारतात त्यामुळे छाती, तोंड,डोके, पोट अशा शरिराच्या विविध अवयवांना मोठी दुखापत होते. बैल हिसडा (हिसका) देतो त्यामुळे हाताचे खांदे देखिल निसटतात. बर्याच वर्षापुर्वी बैलाने हिसका दिल्याने नजीर यांचा डाव्या हाताचा खांदा निसटला आहे. या जखमा शरिरावर घेवून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करावे लागते.

शेती कोण करत नाही, ट्रॅक्टर व टम्पो आले. त्यामूळे व्यवसाय पुर्णपणे बसला आहे. व्यवसाय संपल्यात जमा आहे. जेमतेम आणखी दोन वर्षे हा व्यवसाय चालेल. खाण्याचे देखिल वांदे झाले आहेत.
- नजीर नालबंद, नाल व्यवसाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT