कोकण

किनारपट्टी भागात वादळी वार्‍याचा जोर वाढला

प्रशांत हिंदळेकर

मालवण - पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असून पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून बंदर विभागाच्यावतीने बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली. 

दरम्यान मॉन्सूनला मिळालेली वार्‍यांची साथ चक्रीवादळात मिसळल्याने मॉन्सूनचे आगमन आणखी लांबण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली असताना पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मॉन्सूनच्या आगमनावर झाला असल्याचे दिसून येत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काल काही ठिकाणी पावसाचा किरकोळ शिडकावा झाला. काल सायंकाळपासून किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांचा जोर वाढल्याचे दिसून आले.

समुद्रही खवळला असून त्याने रौद्ररूप धारण केले आहे. आजच्या दुसर्‍या दिवशीही सकाळच्या सत्रात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला असून अजस्र लाटांचा मारा किनार्‍यावर होत होता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे दुपारी पावसाचा शिडकावा झाला. मात्र मोठा पाऊस पडला नाही. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

यासंदर्भात मच्छीमारांशी संपर्क साधला असता मॉन्सूनच्या आगमनासाठी दक्षिणेकडील वार्‍यांचा जोर आवश्यक आहे. मात्र सध्या समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत आहेत. हे मॉन्सूला पोषक नाहीत. मॉन्सूनला ज्या वार्‍याची आवश्यकता होते ते वारे या चक्रीवादळात मिसळले गेल्याने मॉन्सूनचे आगमन आणखी लांबणार असल्याची सद्यःस्थितीत चिन्हे असल्याची माहिती जाणकार मच्छीमारांनी दिली. समुद्रातील चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत असून वादळी वार्‍यांमुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT