Strict Lock Down In Vaibhavwadi Sawantwadi City Of Sindhudurg
Strict Lock Down In Vaibhavwadi Sawantwadi City Of Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गातील `या` शहरात लाॅकडाऊन कडक

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदु्र्ग ) - येथील शहरामध्ये आज कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कुठलीही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले नाहीत. शिवाय विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांनी सूचना देत दम भरला. शहरात स्थानिक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसह होमगार्ड व दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी देखरेख तसेच तैनात केले होते. 

येथील शहरांमध्ये स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड तसेच सिंधुदुर्ग मुख्यालयाकडून दंगल नियंत्रण पथक काही तैनात केले होते. या वेळी पोलिसांनी शहरातील विविध भागांतून पेट्रोलियम केले. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दोन ते आठ जुलैपर्यंत सिंधुदुर्गात कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. याला जनतेसह व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अचानक रुग्ण वाढीचा वेग वाढला असल्याने जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी हा निर्णय घेतला आहे. याला लॉकडाउनबाबत काही नागरिक आणि व्यापाऱ्यात नाराजी असलेले दिसून आले. शहरात मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते तसेच दूध विक्रेते याव्यतिरिक्त अन्य सर्व मोबाईल, भांडी, इलेक्‍ट्रॉनिक, पान टपरी, हॉटेल चहाच्या टपऱ्या आदी सर्व दुकाने बंद होती. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब बाबर यांनी स्पीकरद्वारे नागरिकांना लॉकडाउनचे नियम सांगून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पोलिस ठाण्याचे 20 स्थानिक पोलिस कर्मचारी तैनात केले होते. तर शहराच्या विविध भागात 25 होमगार्ड आणि 10 ते 15 जणांचे दंगल नियंत्रण पथक कडकडीत बंदोबस्तात सहभागी झाले होते. 
 
कणकवली बाजारपेठेत शुकशुकाट 
कणकवली - आजपासून जिल्ह्यात लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली. तर लॉकडाउनला विरोध करण्यासाठी शहरातील अत्यावश्‍यक सेवेची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला होता. त्यामुळे आज कणकवली बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. 

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 ते 8 जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केले. त्याची सुरवात आज (ता. 2) पासून झाली. यात कणकवली शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील दुकानेही बंद ठेवली होती. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनला विरोध करण्यासाठी व्यापारी महासंघाने बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील सर्वच दुकाने बंद होती. 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT